केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक दिल्लीला रवाना

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

गोमेकॉ’ इस्पितळात दोन महिन्यांहून अधिक काळ उपचार घेतल्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद ऊर्फ भाऊ नाईक हे काल दिल्लीला रवाना झाले. ते दिल्लीत सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनाला ते उपस्थिती लावून कामकाजात सहभागी होणार आहे.

पणजी: कर्नाटकातील अंकोलाजवळील रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेले व त्यानंतर ‘गोमेकॉ’ इस्पितळात दोन महिन्यांहून अधिक काळ उपचार घेतल्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद ऊर्फ भाऊ नाईक हे काल दिल्लीला रवाना झाले. ते दिल्लीत सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनाला ते उपस्थिती लावून कामकाजात सहभागी होणार आहे. तसेच आयुष मंत्रालयाचा ताबा घेणार आहेत. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे दिल्लीला गेले असले, तरी अजूनही ते आजारातून पूर्ण बरे झालेले नाहीत.

गोव्यातील नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण व तारीख जाहीर करा अन्यथा... 

दहा दिवसांपूर्वी ‘गोमेकॉ’ इस्पितळातून त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. त्यानंतर हे आडपई येथील आपल्या मूळ गावी विश्रांती घेत होते. अद्यापही त्यांना चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यांचा डावा हात अद्यापही फ्रॅक्चर अवस्थेत आहे. ते आज खास विमानाने दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, गेल्या शुक्रवारी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोमेकॉ इस्पितळात जाऊन आरोग्याची तपासणी करून घेतली होती व दिल्लीला जाण्यासाठी डॉक्टरांची परवानगी घेतली होती. गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी इतर डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांची तपासणी करून त्यांना दिल्लीला जाण्यास परवानगी काही अटींवर दिली आहे.

प्रभाग राखीवतेत पुन्हा घोळ झाल्यास न्यायालयात अवमान याचिका - सरदेसाई 

त्यांना अधिक लांबचे अंतर चालण्यास तसेच कामाचा ताण घेण्यास मनाई करण्यात आली आहे. आरामाबरोबरच दरदिवशी हातापायांची हालचाल होण्यासाठी फिजिओथेरपी सक्तीची करण्यात आली आहे. अजूनही त्यांच्यावरील शस्त्रक्रियेच्या जखमा पूर्ण बऱ्या झालेल्या नाहीत. त्यांच्यासोबत ‘गोमेकॉ’ इस्पितळातून कोणीही डॉक्टर सोबत गेलेला नाही. कारण, त्यांची प्रकृती बऱ्यापैकी सुधारत असल्याने त्याची गरजही नाही. त्यांनीही डॉक्टर देण्याची विनंती केलेली नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. 

संबंधित बातम्या