केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार ) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद  नाईक यांना आयसीयूमधून सामान्य प्रभागात हलविण्यात आले आहे.

 पणजी: केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार )  आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद   नाईक यांना आयसीयूमधून सामान्य प्रभागात हलविण्यात आले आहे. यावर   नाईक यानी  पंतप्रधान  नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती  वेंकैया नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना कठीण काळात वेळेवर सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 
नाईक यांनी गोव्याचे आरोग्यमंत्री  विश्वजित राणे, जीएमसीएच डीन डॉ शिवानंद बांदेकर, त्यांचे सहकारी  डॉक्टर, परिचारिका, जीएमसीएचचे  कर्मचारी तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाच्या डॉक्टरांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
11 जानेवारी रोजी सोमवारी धर्मस्थळला एका कार्यक्रमात हजेरी लावून गोव्याला परतत असताना  श्रीपाद नाईक यांच्या कारला गोकर्णजवळील होसूर येथे भीषण अपघात झाला. त्याच दिवशी त्याना गोव्यात दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात  उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या