केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले गोवा दौऱ्यावर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज दुपारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार घेत असलेल्या केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

पणजी: केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज दुपारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार घेत असलेल्या केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गेले महिनाभर नाईक हे गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत आहेत. कर्नाटकच्या दौऱ्यावर असताना अंकोला नजीक त्यांची कार पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात ते जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर सुरवातीला गोमेकॉच्या अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले,नंतर आता खास कक्षात उपचार सुरू आहेत. या अपघातात नाईक यांच्या पत्नी विजया यांना प्राण गमवावे लागले होते. 

देवघर टू गोवा व्हाया महाराष्ट्र; रेल्वे मंत्र्यांकडून झारखंडला मोठ गिफ्ट -

आठवले कालपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. काल वास्को येथे आठवले यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि भूमिहीनांना जमीन वाटप कसे करता येईल या विषयीचा आराखडा तयार करण्याची घोषणा केली. आज सकाळी ते पणजी आले त्यानंतर त्यांनी बांबोळी येथे जाऊन नाईक यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी  नाईक यांनी लवकरात लवकर बरे होऊन देशाच्या सेवेत रुजू व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या