Nanda Lake Cleaning Campaign: नौदल जवानांचा अनोखा उपक्रम; नंदा तलावाची केली स्वच्छता

पुनित सागर अभियानांतर्गत राबवला उपक्रम
Nanda Lake Cleaning campaign held by naval officers
Nanda Lake Cleaning campaign held by naval officers Dainik Gomantak

केंद्र सरकारने रामसर स्थळ म्हणून घोषित केलेल्या काकोडा-घोटमरड येथील नंदा तलावाची शनिवारी वास्को मुख्यालयातील नौदल कर्मचाऱ्यांच्या पथकाने स्वच्छता केली. पुनित सागर अभियानांतर्गत हा राबविण्यात आला.

या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी काही नौदल अधिकारी वाहनांनी आले, तर काही जण वास्कोपासून सायकलने सुमारे 50 किलोमीटरचे अंतर पार करून घटनास्थळी पोहोचले. (Nanda Lake Cleaning campaign held by naval officers)

Nanda Lake Cleaning campaign held by naval officers
Solar Ferry Boat : अखेर सौर ऊर्जेवरील फेरीबोट 4 मे पासून कार्यान्वित

पत्रकारांशी बोलताना अधिकारी पांडा म्हणाले की, पुनित सागर अभियानांतर्गत नौदल कर्मचार्‍यांनी आत्तापर्यंत गोव्यातील पश्चिम आणि पूर्व सागरी किनारपट्टीवर सात स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत. तरीही ते पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी अशा आणखी मोहिमा राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

CCMC चेअरपर्सन डॉ. जास्मिन ब्रागांझा म्हणाल्या की, रामसर साइट नागरी संस्थेच्या अखत्यारीत येते जी रहिवाशांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. वास्कोहून येऊन रामसर साइटची स्वच्छता केल्याबद्दल त्यांनी नौदल कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

स्थानिक नगरसेवक आणि कुडचडे भाजप ब्लॉक अध्यक्ष विश्वास सावंत यांनीही रामसर साइटवर पुनित सागर अभियान राबविल्याबद्दल नौदल पथकाचे आभार मानले आणि लोकांना रामसर साइट स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

नंतर काही स्थानिकांनी माहिती दिली की, नंदा तलाव हे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी होणार आहे. असे दिसून आले आहे की काही लोक दिवसाच्या वेळेत तलावाच्या परिसरात जातात आणि सहलीला आल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या आणि दारूच्या बाटल्यांसह भरपूर कचरा करतात.

अशा गोष्टींवर आळा ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com