गोव्यातील विद्यापीठ-महाविद्यालये सोमवारपासून सुरू

गोव्यातील विद्यापीठ-महाविद्यालये  सोमवारपासून सुरू
goa university

पणजी : राज्यातील(Goa) महाविद्यालये(Collage) तसेच गोवा विद्यापीठ(University) कार्यालय 7 जूनपासून खुली करण्याचा निर्णय घेतला असून कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचा आदेश काढला आहे. महाविद्यालयीन शिक्षकांना 7 जूनपासून, तर विद्यापीठ अध्यापकांना 7 जूनपासून कामावर हजर होण्याचा आदेश सरकारने काढला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण ‘डिजिटल मोड’मध्ये सुरू राहणार असल्याचे काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. राज्यातील ‘कोविड - 19’ परिस्थितीत गेल्या काही दिवसांत सुधारणा झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.(Universities and colleges start from Monday in Goa) 

महाविद्यालयातील व गोवा विद्यापीठातील शिक्षण डिजिटल मोडमध्ये दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण संबंधित किंवा इतर कामासाठी पुढील आदेश काढण्यात येईपर्यंत शैक्षणिक संस्थामध्ये येण्यास परवानगी नाही. ज्या शैक्षणिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांना कोविड - 19 च्या कामासाठी नेमण्यात आले आहे त्यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या सेवेतून टप्प्याटप्प्याने मुक्त केल्यानंतर सेवेत संबंधित शैक्षणिक संस्थामध्ये रूजू व्हावे असे तोपर्यंत तेथेच काम सुरू ठेवावे, असे उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

दरम्यान, शिक्षण संचालक डी. आर. भगत यांनीही परिपत्रक जारी केले असून सरकारी तसेच बिगर सरकारी (अनुदानित व बिगर अनुदानित) शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ कामासाठी 7 जूनपासून हजेरी लावण्याचे त्यात नमूद केले आहे. राज्यस्तरीय कर्फ्यू असताना सर्व शैक्षणिक संस्था 29 एप्रिलपासून बंद करण्यात आल्या होत्या. नंतर ही मुदत वाढवण्यात आली व ती आजपर्यंत कायम होती. गेल्या 1 जूनपासून सरकारी कार्यालयेही पूर्णवेळ सर्व कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यात आली आहेत त्यामुळे शैत्रणिक क्षेत्रातील महाविद्यालयातील प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हा आदेश लागू करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com