महाविद्यालये दिवाळीनंतर खुली : यूजीसी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत, अशी सूचनाही आयोगाने केली असून त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत.

 

पणजी : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत, अशी सूचनाही आयोगाने केली असून त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी आरोग्य सेतू ॲप मोबाईलमध्ये असणे आवश्‍यक असणार आहे. 

मार्च महिन्यापासून बंद असलेली महाविद्यालये दिवाळीनंतर खुली करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. जे विभाग प्रतिबंधित क्षेत्रात नाहीत तेथील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावीत. विद्यार्थीसंख्येच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावेत, असेही सूचनेत म्हटले आहे. जेथे शक्‍य आहे तेथे निवासी हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र, एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी देण्यात यावी, असेही मार्गदर्शक सूचनेत सांगण्यात आले आहे. प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झाले, तरी विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे, असेही त्यात स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या