शुल्क वाढ न करण्याचा विद्यापीठाचा निर्णय

विलास ओहाळ
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील विविध पदवी (यूजी) आणि पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हप्त्याने शुल्क भरण्यासाठी परवानगी देण्याचेही विद्यापीठाने ठरविले आहे.

पणजी
गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील विविध पदवी (यूजी) आणि पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हप्त्याने शुल्क भरण्यासाठी परवानगी देण्याचेही विद्यापीठाने ठरविले आहे. हे शुल्क भरण्यासाठी पाच आणि सात हप्त्यांची सोय त्या-त्या अभ्यासक्रमानुसार ठरविण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी यांच्या सहीनुसार याविषयीचे परिपत्रक फॅकल्टी डिन, स्कूलचे व्हाईस डिन, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुखांना ते पाठविण्यात आले आहे. कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील स्थिती पाहता परिस्थिती पाहता पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या