Unknown Body Found in Anjune Dam : धक्कादायक; अंजुणे धरणात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला

केरी सत्तरीतील अंजुणे धरणात अज्ञाताचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसला.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Body Found in Anjune Dam : अंजुणे धरणात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सोमवारी सकाळी केरी सत्तरीतील अंजुणे धरणात अज्ञाताचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसला. याची माहिती मिळताच तातडीने वाळपई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

सकाळीच या भागातील काही लोकांना धरणाच्या पाण्यात काहीतरी तरंगत असल्याचं आढळलं. जवळ जाऊन पाहिल्यावर तो एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. याची माहिती स्थानिकांनी तातडीने वाळपई पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मात्र मृतदेह पाण्यात असल्याने पोलिसांना अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली. हा मृतदेह नेमका कुणाचा याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे.

Goa Crime News
सुर्ला फेरीजवळ अज्ञाताचा मृतदेह तरंगताना आढळला

दरम्यान सत्तरी परिसरात मृतदेह आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काही महिन्यांपूर्वी साखळी सुर्ला फेरीजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला होता. हा मृतदेह पुरुषाचा असल्याचं स्पष्ट झालं होतं. तर अंजुणे धरणातील मृतदेहही एका पुरुषाचाच आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरु असून ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपासही पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com