इमारतवरून खाली कोसळल्याने अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी!

येथील अपना बाजार या दोन मजली संकुलात दुकान आस्थापने असून तळमजल्यावर तसेच प्रत्येक मजल्यावर शौचालये आहेत.
इमारतवरून खाली कोसळल्याने अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी!
Dainik Gomantak

वास्को: वास्कोत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अपना बाजार या संकुलातील शौचालयात एक अनोळखी इसम वरच्या मजल्यावरून खाली कोसळल्याने त्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली. तसेच त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. पोलीस तसेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून त्याला तातडीने इस्पितळात हलवण्यात आले.

(Unknown person seriously injured after falling from building)

इमारतवरून खाली कोसळल्याने अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी!
पेनया यांच्यासमवेत खेळल्याचा फायदाच! सेरिटन फर्नांडिस यांचे मत

येथील अपना बाजार या दोन मजली संकुलात दुकान आस्थापने असून तळमजल्यावर तसेच प्रत्येक मजल्यावर शौचालये आहेत. दरम्यान तळमजल्यावर असलेल्या शौचालयात बाजूला पॅसेज असून ही जागा तशीच सोडलेली आहे.

आज संध्याकाळी 6:30 वाजता या पॅसेजमध्ये एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत विव्हळत पडला असलेला शौचालयात गेलेल्या एका दुकानदार मालकाच्या नजरेस आला. त्याने तात्काळ पोलीस तसेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. हा अनोळखी इसम व्हीवळत रडत होता. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्याला उचलून रुग्णवाहिकेत घालून इस्पितळात नेण्यात आले. हा इसम त्या पॅसेजमध्ये कसा पडला व तो का आला होता याची काही माहिती नसल्याने दुकानदाराने सांगितले. चोरी करण्यासाठी आला होता की काय असाही प्रश्न उपस्थिताना पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com