डिचोली अर्बन सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बिनविरोध निवड

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

डिचोली अर्बन सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड ्‌‌‌‌‌‌‌‌‌झाली असून, केवळ एक महिला वगळता विद्यमान अध्यक्ष गुरुदत्त संझगिरी यांच्यासह विद्यमान अकरा संचालक पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. 

डिचोली: डिचोली अर्बन सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड ्‌‌‌‌‌‌‌‌‌झाली असून, केवळ एक महिला वगळता विद्यमान अध्यक्ष गुरुदत्त संझगिरी यांच्यासह विद्यमान अकरा संचालक पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. 

नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी लवकरच नूतन संचालक मंडळ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

या बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आल्याने नव्याने संचालक मंडळ निवडण्यासाठी निवडणूक ्‌‌‌‌‌‌‌प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र, अंतिम मुदतीपर्यंत संचालक मंडळाच्या बारा जागांसाठी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले नसल्याने संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. 

दरम्यान, बॅंकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी पुढील आठवड्यात नूतन संचालक मंडळाची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदात बदल होणार नसल्याचे खात्रीलायक माहितीवरुन समजते.  बॅंकेवर बिनविरोध निवडून आलेले संचालक असे-गुरुदत्त संझगिरी, उमेश झांट्ये, प्रवीण झांट्ये, रोहित झांट्ये, विनायक शिरोडकर, रामचंद्र गर्दे, डॉ. शेखर साळकर, रामानंद नाटेकर, रोहिदास जल्मी, सुदेश नाईक, पल्लवी साळगावकर आणि सौ. सुविधा कडकडे.

संबंधित बातम्या