पेडणे नगराध्यक्षपदी माधव देसाई बिनविरोध निवड

उपनगराध्यक्षपदी तृप्ती सावळ देसाई
पेडणे नगराध्यक्षपदी माधव देसाई बिनविरोध निवड
Pernem Municipality News | Madhav Desai NewsDainik Gomantak

पेडणे: पेडणेच्या नगराध्यक्षपदी माधव शेणवी देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी तृप्ती सावळ देसाई यांची आज बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षपदासाठी माधव देसाई यांचे नाव नगरसेवक मनोज हरमलकर यांनी सुचविले. तर उप नगराध्यक्षपदासाठी तृप्ती सावळ देसाई यांचे नाव विशाखा गडेकर यांनी सुचविले.

यावेळी शिवराम तुकोजी,मनोज हरमलकर, सिध्देश पेडणेकर, अश्विनी पालयेकर, उषा नागवेकर, विशाखा गडेकर या एकूण दहा नगरसेवकांपैकी आठ नगरसेवक उपस्थित होते. तर ज्येष्ठ नगरसेवक विष्णू साळगावकर व नगरसेविका राखी कशालकर हे दोन नगरसेवक उपस्थित नव्हते.

Pernem Municipality News | Madhav Desai News
मडगावातील 'कॅनरा बॅंक' फसवणूकप्रकरणी महिलेला अटकपूर्व जामीन

निर्वाचन अधिकारी म्हणून म्हापसा पालिका मुख्याधिकारी सीताराम सावळ यांनी काम पाहिले. त्यांना पेडणे पालिका मुख्याधिकारी मनेश हरी केदार यांनी साहाय्य केले. नगराध्यक्षपदी माधव देसाई व उप नगराध्यपदी तृप्ती सावळ देसाई यांची निवड झाल्याचे जाहीर झाल्यावर सर्व नगरसेवक, हितचिंतकांनी तसेच आमदार प्रवीण आर्लेकर यांनी नव्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले.

पालिकेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य असेल, असे ते म्हणाले. करारानुसार नागवेकर, हरमलकर यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.