Panjim: मिरामार येथील पार्क अस्वच्छतेच्या गर्ततेत...

साफसफाईकडे दुर्लक्ष : गणेशोत्सवामुळे कामगार फिरकलेच नाहीत; पर्यटक, स्थानिकांत नाराजी
 Miramar Beach
Miramar BeachSandip Desai

पणजी: मिरामार किनाऱ्यावर इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) कंपनीने अमृत योजनेंतर्गत मुलांना खेळण्यासाठी पार्क तयार केला आहे, परंतु गणेशोत्सव काळात सध्या या पार्कच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मार्ट सिटींतर्गत या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी खेळणी, त्याशिवाय फुलझाडे व बसण्यासाठी सुविधा उभारल्या आहेत.

(Unsanitary everywhere in the park at Miramar)

 Miramar Beach
Ganesh Chaturthi: कुंभारजुवेत रंगला सांगोडोत्सव

मिरामार किनाऱ्यावर दररोज हजारोच्या संख्येने देशी पर्यटक भेट देतात. या ठिकाणी कचरा कुंड्याही ठेवल्या आहेत, परंतु काहीजण कचरा इतरत्र टाकून जातात. शिवाय कचरा हटविण्यासाठी सफाई कामगार या ठिकाणी असतात, पण गणेशोत्सवामुळे ते कर्मचारी फिरकले नसल्याने या ठिकाणी कचरा दिसून येत आहे.

किनाऱ्यावरील या पार्कमुळे पणजी शहर व परिसरातून अनेक कुटुंबे लहान मुलांना घेऊन या पार्कमध्ये येतात. याशिवाय परराज्यातील व विदेशी पर्यटकही या परिसरात येऊन छायाचित्रे काढत असतात. मिरामार हे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे एक सहजपणे भेट देण्यासाठी उपलब्ध असणारे ठिकाण आहे. त्यामुळे सतत पर्यटकांची ये-जा या ठिकाणी असते. काही पर्यटक खाद्यपदार्थ पार्सल घेऊन येऊन किनाऱ्यावर खातात आणि पॅकिंगचे कागद वगैरे टाकून जातात

फलकावरील ‘ए’ अक्षर गायब

मिरामार किनाऱ्यावरील पार्कची स्मार्ट सिटींतर्गत निर्मिती करण्यात आली असून पर्यटक व स्थानिकांसाठी हे ठिकाण आकर्षण बनले आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक व स्थानिक छायाचित्रे काढण्यात दंग असतात, परंतु या ठिकाणी ‘मिरामार’ या इंग्रजी अक्षरातील फलकावरील ‘ए’ हे अक्षर गायब झाले आहे. तरीही या ठिकाणी पर्यटक उत्साहाने छायाचित्रे घेतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com