गोव्यात अवकाळी पावसामुळे संसर्गजन्‍य आजारांत वाढ

राज्यात आधीच कोविडने लोकांची घाबरगुंडी उडविली आहे. त्यात पावसामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखवण्याचे प्रकार वाढले आहे.
गोव्यात अवकाळी पावसामुळे संसर्गजन्‍य आजारांत वाढ
Untimely rains in Goa increase in infectious diseases Dainik Gomantak

पणजी: राज्यात अवकाळी पावसामुळे संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाच्या साठणाऱ्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्यानेही आजार वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. विविध आजारांना हे वातावरण निमंत्रण देत आहे. त्यामुळे पणजीसह विविध शहरे आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. गोमेकॉमध्येही रुग्णांची संख्या वाढली असून, दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. विशेषतः सर्दी, खोकला आणि ताप या लोकांच्या आरोग्य विषयक समस्या आहेत.

पावसाची हजेरी कायम राहिल्यास राज्यात संसर्गजन्‍य आजार वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परिसरात साचून राहणाऱ्या‍ पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आजार बळावतात. ते सुरुवातीला सामान्य वाटत असले तरी, त्यातून न्यूमोनिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा आजारांचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून जागृती केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Untimely rains in Goa increase in infectious diseases
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या 'सी प्लेन' सेवेला विलंबच

भीती कोविडची!

राज्यात आधीच कोविडने लोकांची घाबरगुंडी उडविली आहे. त्यात पावसामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखवण्याचे प्रकार वाढले आहे. ही सर्व कोविडचीही लक्षणे असल्यामुळे लोकांमध्ये भीती आहे. पण, प्रत्यक्षात पावसामुळे हे संसर्गजन्‍य आजार वाढल्याचे खासगी डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य खात्याकडून मात्र याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

Untimely rains in Goa increase in infectious diseases
गोवा विधानसभा की पांढरा हत्ती?

सध्‍याच्‍या वातावरणात सर्दी, खोकला ही आजाराची सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

-डॉ. नागेश भाटकुली

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com