गोवा क्रांती दिनाच्या औचित्यावर खास ऑनलाईन सर्वेक्षणाचे अनावरण

गोवा क्रांती दिनाच्या औचित्यावर खास ऑनलाईन सर्वेक्षणाचे अनावरण
hajik.jpg

पणजी : विशेष व्यक्तींसाठी काम करणाऱ्या डिसेबिलिटी राईट्स असोसिएशन (Disability Rights Association Of Goa) ऑफ गोवा ( ड्रॅग ) या संस्थेने गोवा क्रांती दिनाचे (Revolution Day) औचित्य साधून शुक्रवारी समाज कल्याण खात्याचे उपसंचालक आणि विशेष व्यक्ती सेलचे प्रमुख ताहा हाजिक (Taha Hajik) यांच्या हस्ते विशेष व्यक्तींसाठी खास ऑनलाईन सर्वेक्षणाचे अनावरण करण्यात आले. 

यावेळी डिसेबिलिटी राइट्स असोसिएशन ऑफ गोवाचे अवेलिनो डिसा (Avelino Disa)  आणि विशेष व्यक्तींच्या हक्कासाठी काम करणारे कार्यकर्ते प्रकाश कामत(Prakash Kamat) उपस्थित होते. ताहा हाजिक यांनी सर्वेक्षण फॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती भरून सर्वेक्षणचे अनावरण केले.  (Unveiling of special online survey on the occasion of Goa Revolution Day)

ड्रॅगच्या फेसबुक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) पेजवर सर्वेक्षण फॉर्म उपलब्ध असेल. हे समाज माध्यामांवर व्यापकपणे प्रसारित केले जाईल. आपल्या राज्यात या प्रकारचे मोठया स्तरावर सर्वेक्षण होत आहे आणि यात २१ प्रकारचे विशेष व्यक्तींचा समावेश असेल. सामाजिक आणि धार्मिक संस्था, राजकीय पक्ष, पंचायत आणि नगरपालिका यांनी पुढाकार घेऊन ड्रॅगला महत्त्वाचे डेटा गोळा करण्यासाठी मदत करण्याची विनंती ड्रॅगचे अवेलिनो डिसा यांनी केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com