11 वर्षीय मुलीवर बलात्कार, यूपीच्या युवकाला अटक

कोलवा परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
11 year old girl raped in Colva
11 year old girl raped in ColvaDainik Gomantak

मडगाव : कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि बलात्कार केल्याने पोलिसांनी धर्मेंद्र यादव या 28 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

संशयित यादव हा मूळ उत्तर प्रदेश येथील असून गोव्यात तो एका खासगी कंपनीत काम करत होता. पीडित मुलगी त्याच्या शेजारीच राहत होती. त्याने तिच्याकडे दोस्तीचे संबंध वाढवून तिच्यावर ही बळजबरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (11 year old girl raped in Colva)

11 year old girl raped in Colva
आयकर निरीक्षकांची उद्या चौकशी, पणजी पोलिसांकडून समन्स

दरम्यान, सावर्डे ते गुड्डेमळ मुख्य रस्त्याच्या बाजूला जंगलात महिलेचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह रूपा पारकर (वय 55) असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपास करून
मृतदेह शवविच्छेदनास पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालातून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कुडचडे पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसर, मृत महिला नातेवाईकांसोबत करमणे येथे राहत होती. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पोलिस खून कुणी केला याचा कसून तपास करत आहेत.
संबंधित महिलेच्या मालमत्तेची काही दिवसांपूर्वी विक्री झाली होती. त्यातून तिला बरेच पैसे मिळाले होते. "या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल आणि आरोपीला अटक करण्यात येईल," असे कुडचडे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com