धर्म संस्कारांचा वारसा जपा; तपोभूमीवर उपनयन संस्कार समारंभ उत्साहात

प्रत्येक हिंदूने धर्म संस्कारांचा वारसा जपावा, असे आवाहन ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले.
rite ceremony
rite ceremonyGomantak Digital Team

खांडोळा : उपनयन संस्कार म्हणजेच अग्नीचे व्रत धारण करणे होय. अग्निस्वरूप सद्‍गुरूंना आपला मुलगा समर्पित केला किंवा आपल्या मुलांना सद्‍गुरू हा देव आहे, अशी शिकवण दिली तर ते ज्ञानी होतात. ज्यांना सात्त्विक, सज्जन व्हायचे आहे, ज्याला परमेश्वराचे सांगणे आहे ते मान्य करून जगायचे आहे, अशांनी हे जगणे आपल्या गृहस्थाश्रमात आणलेच पाहिजे. प्रत्येक हिंदूने धर्म संस्कारांचा वारसा जपावा, असे आवाहन ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे पूज्य स्वामीजींच्या अधिष्ठानाखाली व दिव्य मार्गदर्शनाने श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर सामूहिक उपनयन संस्कार समारंभाचे आयोजन 20 व 21 मे रोजी करण्यात आले होते, याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.

rite ceremony
Khandola News : तपोभूमीचे जनकल्याणार्थ व्यापक कार्य

स्वामींजी पुढे म्हणाले, शिक्षण घेण्याची सुरुवात उपनयन संस्कारानंतर होते. गुरु मुलांना फक्त ज्ञानदान करीत नसतात तर त्यांच्यावर उत्तम प्रेमही करतात. त्या मुलांच्या मुखात वेद मंत्रच आले पाहिजे, शिवीगाळ असता कामा नये. प्रत्येक देवस्थानांच्या माध्यमातून उपनयन संस्कार आयोजित करा.

rite ceremony
Khandola Temple Theft : खांडोळा गणेश मंदिरातील चोरीचा तब्बल तीन महिन्यांनी लागला छडा

मुलांना धर्म, अध्यात्म तसेच सद्‍गुरू हा विषय समजावून सांगायला हवे. देवाच्या नावाने जी काही थोतांडे केली जातात, ती आता बंद करावी. ज्याद्वारे गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती पटणार आहे, असे कर्म करा. त्यातच तुमचे कल्याण, अभ्युदय दडलेले आहे. म्हणून आपण सर्वांनी या संस्कारांकडे वळले पाहिजे, असे हिंदू धर्मातील संस्कार आहेत.

उपनयन संस्काराचा लाभ

संस्काराचा लाभ गंधर्व चितेंद्र कुंडईकर - करमळी, अनीश बाबुराव शिरोडकर - पेडणे, वाचस कमलाकांत फातर्पेकर - कालापूर, निखिल नितीन सडेकर - खानापूर, सिद्धार्थ नीलेश आजगांवकर - सांकवाळ, आराध्य पांडुरंग नाईक - वाळपई, तनय नवनाथ साळगांवकर - हडफडे हणजूण, श्रेयस रघुनाथ परब - डिचोली, कु. पवन परशुराम पाटील - खानापूर, राम बाबनी मांद्रेकर, हर्ष नरेंद्र बांदोडकर - चोडण,

rite ceremony
Khandola Temple Theft : खांडोळा देवस्थानमधील चोरीला सचिव व मामलेदार जबाबदार; भाविकांचा आरोप

मयंक संदिप पार्सेकर - चोडण, ओम विजय मंगेशकर, वेदांत नवनाथ मठकर - कळंगुट, पुरुषोत्तम रंगनाथ मठकर - कळंगुट, निरंजन गोविंद पालकर - कालापूर, रामेश्वर उल्हास कुंकळकर - चिंबल, सोहन सदानंद शिरोडकर - चिंबल, सुभाष धर्मेंद्र चारी - साखळी, शुबन दत्तप्रसाद आपुले - पर्वरी, रेयांश अवधूत नाईक - कुडचडे, श्लोक रविकुमार गुत्ती - कुंडई या भाग्यवंत बटुंनी घेतला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com