गोव्यातील 11 नगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर 

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

गोव्यातील 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी नगरविकास खात्याने आरक्षणाचा आदेश काढला आहे.

पणजी : गोव्यातील 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी नगरविकास खात्याने आरक्षणाचा आदेश काढला आहे. त्यामध्ये महिला, अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी प्रभाग आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. या ११ पालिकांमध्ये मडगाव, मुरगाव, म्हापसा, कुडचडे काकोडा, केपे, कुंकळ्ळी, काणकोण, पेडणे, डिचोली, सांगे, वाळपई यांचा समावेश आहे.

मोप विमानतळ प्रकल्पासाठी स्थानिकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न

ही निवडणूक मार्चमध्ये होणार असली तरी येत्या काही दिवसांत गोवा राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. साखळी व फोंडा पालिका तसेच पणजी महापालिकेची मुदत संपलेली नाही त्यामुळे या निवडणुका या ११ पालिकांबरोबर न घेता पंचायत व जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीबरोबर होण्याची शक्यता आहे.

गोवा अर्थसंकल्प 2020-21: यंदाचा अर्थसंकल्प स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेवर आधारित

संबंधित बातम्या