गोव्याच्या काजू फेणीला अमेरिकेची बाजारपेठ खुली

चौगुले कॉलेजशी करार: फेणीला येणारा उग्र वास काढून टाकण्यासाठी संशोधन
Cashew
CashewDainik Gomantak

मडगाव: गोव्यातील हेरिटेज ड्रिंक म्हणून मान्यता मिळविलेल्या काजू फेणीला आता अमेरिकन बाजारपेठ खुली झाली आहे. मात्र, या फेणीला येणारा उग्र वास या पारंपरिक पेयाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी अडचण ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर हा उग्र वास कमी कसा करायचा यावर संशोधन सुरू झाले असून, त्यासाठी अमेरिकेत फेणी निर्यात करणाऱ्या ‘काजकार हेरिटेज डिस्टीलरीज’ या कंपनीने आज माडगावच्या चौगुले महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला.

Cashew
कामगारदिनी पणजीत 'मोर्चा' मिरवणूक

चौगुले महाविद्यालयाच्या मायक्रो बायोलॉजिस्ट डॉ. सुप्रिया खोर्जुवेकर या प्रकल्पाच्या मुख्य संशोधक असून, ही फेणी चांगल्याप्रकारे कशी आंबवता येईल यावर त्या गोव्यातील सर्व भागात जाऊन ज्या ठिकाणी काजू फेणी तयार करतात तिथे जाऊन नमुने तपासून एक सर्वमान्य प्रक्रिया तयार करणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास गोव्यातील काजू फेणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मागणी वाढणार आहे.

काजकारचे व्यवस्थापकीय संचालक गुरुदत्त भक्ता व चौगुलेच्या प्राचार्य डॉ. शैला घंटी यांनी आज या करारावर सह्या केल्या. यावेळी प्रमुख संशोधक डॉ. खोर्जुवेकर, काजू फेणी उत्पादक संघटनेचे सचिव हेंझिल वाझ, अबकारी खात्याचे अधिकारी शांबा नाईक तसेच विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे दीपक परब हे उपस्थित होते. काजकार कंपनीच्या फेणीला अमेरिकेत मोठी मागणी आहे. मात्र त्यासाठी त्यांना चार वर्षे अक्षरशः घाम गाळावा लागला. या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काजू फेणीला आणखीन मागणी वाढणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची फेणी गोव्यात उत्पादित व्हायला हवी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com