गोव्यात शेतीकामासाठी होणार 'Drone' तंत्रज्ञानाचा वापर!

मेकॅनिकल शाखेतील प्रोफेसर व काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या ड्रोनची निर्मिती केली आहे.
Drone Experiment
Drone ExperimentDainik Gomantak

Engineering Student: आतापर्यंत ड्रोनचा वापर फोटोग्राफीसाठी, एखादी जागा शोधण्यासाठी किंवा एखाद्याचा शोध घेण्यासाठी होत असे, पण आता ड्रोनचा वापर कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठीही होण्यास प्रारंभ झाला आहे. 2020 साली फातोर्डा येथील डॉन बॉस्को इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या (Don Bosco College Of Engineering) मेकॅनिकल शाखेतील प्रोफेसर व काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या ड्रोनची निर्मिती केली आहे.

या ड्रोनद्वारे शेत लागवडीच्यावेळी खत टाकण्यासाठी, जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यासाठी, तसेच माडावरील नारळ पाडणेही सोपे झाले आहे. मेकॅनिकल विज्ञान शाखेतील साहाय्यक प्रोफेसर गौरीश सामंत यांच्यासह एलरिक गुदिन्हो, क्रिस फर्नांडिस, वायलन डिसोझा, रिव फर्नांडिस, आरोन फर्नांडिस या विद्यार्थ्यांनी या ड्रोनचे डिझाईन व विकास करण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

Drone Experiment
Goa पोलिसांकडून फोंड्यात 'हॅकेथन' स्पर्धा

त्यांनी तयार केलेला हा प्रॉजेक्ट गोव्याचे मुख्य सचिव, कृषी खाते यांच्यापुढेही सादर करण्यात आला व प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. शिवाय त्यांचा हा प्रॉजेक्ट आंतरराष्ट्रीय विज्ञान फिल्म महोत्सवातही सादर करण्यात आला. तसेच 'टॅकनिक्स-2022' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठीही या प्रॉजेक्टची निवड करण्यात आली होती, अशी माहिती साहाय्यक प्रो. गौरीश सामंत यांनी दिली.

Drone Experiment
Goa Government : सरकारी वकिलांवर अडीच वर्षात 7 कोटींचा खर्च!

वार्का येथे प्रात्यक्षिक : फादर जॉर्ज क्वाद्रोस यांनी वार्का येथील शेतकऱ्यांसाठी अलीकडेच या ड्रोनद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी तेथील फादर लुईस आल्वारीस, स्टिफन रिबेलो, सरपंच सेलेसियाना फर्नांडिस, पंचायत सदस्य व स्थानिक शेतकरी उपस्थित होते. फादर क्वाद्रोस यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवतानाच या ड्रोनचा उपयोग व फायदे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com