भाजपच्या 'त्या' उमेदवारावर उत्पल पर्रीकरांचा हल्लाबोल..

मनोहर पर्रीकर यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघातून तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याची परवानगी देत ​​आहात: उत्पल पर्रीकर
भाजपच्या 'त्या' उमेदवारावर उत्पल पर्रीकरांचा हल्लाबोल..
Goa Assembly Election: Utpal ParrikarDainik Gomantak

गोवा: पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. मात्र आता भाजपच्या उमेदवारांवर सडकून टीका केली आहे. (Utpal Parrikar criticizes selection on BJP candidate for goa assembly election)

Goa Assembly Election: Utpal Parrikar
PM-CM मीटिंगमध्ये 'या' गोष्टींवर भर; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

भाजपवर टीका करत "सध्याचे राजकारण मला मान्य नाही; जिंकण्याची क्षमता, सचोटी, चारित्र्य याचा राजकारणात काही फरक पडत नाही का? मनोहर पर्रीकर यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघातून तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याची परवानगी देत ​​आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यात बदल व्हायला हवा आणि म्हणून मी प्रयत्न करत आहे; वडिलांसोबत काम करणारे सर्व ज्येष्ठ नेते आज माझ्यासोबत काम करत आहेत. मी जनतेत जाहीरपणे जात असून, येथे पक्ष स्थापन करणारे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

उत्पल पर्रीकरांचे ते ट्विट चांगलेच चर्चेत

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. या बद्दल त्यांनी काही दिवासांपूर्वी 'आता मागे वळून पाहणार नाही' असे ट्वीट केले होते. त्यामुळे उमेदवारी मिळो अथवा न मिळो, पणजीतून निवडणूक लढवणारच असा ठाम निश्चिय जाहीर केल्याने भाजपसमोरचा पेच वाढला होता.

Goa Assembly Election: Utpal Parrikar
दामोदर मावझो यांनी दुसरे ज्ञानपीठकार निलमणी फुकान यांची घेतली भेट

दरम्यान, यावर बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे फक्त पुत्र म्हणून उत्पल पर्रीकर यांना तिकीट देता येणार नाही. पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट मिळणार नाही, पर्रीकरांनी पक्ष वाढीसाठी आणि गोव्यासाठी भरीव योगदान दिले आहे. मात्र पर्रीकरांचा मुलगा उत्पल परिकर यांना तिकीट उमेदवारी मिळणार नाही त्यासाठी त्यांचं कार्य कर्तुत्व लक्षात घेतल जात.

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता उत्पल पर्रीकर म्हणाले की, ते पक्षातील मोठे व ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्या तुलनेत छोटी व्यक्ती आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर मला बोलायचे आहे. सध्याचे भाजपचे राजकारण बिलकुल मला मान्य नाही. 1994 पासून माझ्या वडिलांसोबत जे सर्व ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते होते, ते माझ्यासोबत काम करत आहेत. मी अगोदर लोकांना भेटत होतो; पण आता निवडणूक जवळ आल्याने जाहीरपणे या लोकांना भेटत आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष स्थापन करण्यामध्ये जे कोणी होते, ते मला पाठिंबा देत सोबत फिरत आहेत.

पक्षाकडून मात्र अद्याप त्यांच्या उमेदवारीला होकार नाही

फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक (Assembly Election) पणजी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याचे उत्पल यांनी जाहीर केले आहे. पक्षाने मात्र त्यांच्या उमेदवारीला होकार दिलेला नाही. त्यामुळे आता उत्पल पर्रीकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.