पत्रकार परिषद घेत उत्पल पर्रीकर जाहीर करणार आपली भूमिका

भाजपने उत्पल यांना तिकीट नाकारल्यानंतर, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोवा निवडणूक लढवण्यासाठी 'आप'मध्ये सामील होण्याची दिली ऑफर
पत्रकार परिषद घेत उत्पल पर्रीकर जाहीर करणार आपली भूमिका
Utpal Parrikar press conference today Twitter/@ANI

गोवा (Goa Election 2022) भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे (Manohar Parrikar) पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikaar) यांना आतापर्यंत तिकीट मिळाले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगत होते. आता आपले पुढचे पाऊल काय असणार भाजपने दिलेल्या ऑफरा विचार करणार की नाही हे आज जाहीर करणार असल्याचे उत्पल यांनी सांगितले आहे. उत्पल पर्रीकर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'गोवा विधानसभा निवडणुकीबाबत (Goa Assembly polls 2022) मी आज पत्रकार परिषद घेणार आहे' असे सांगितले. (Utpal Parrikar will hold press conference today to announce for Goa Assembly polls 2022 decision)

उत्पल यांना तिकीट न दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल आपले मत व्यक्त केले. 'आमचे केंद्रीय नेते उत्पल पर्रीकर यांच्या संपर्कात आहेत. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वेगळ्या गोष्टी बोलले होते आणि आता ते राजकीय फायद्यासाठी वेगळ्या गोष्टी बोलत आहेत. गोव्यातील जनतेला हे समजले आहे आणि म्हणून गोव्यातील जनता पुन्हा भाजपचे सरकारला सत्तेवर आणतील,' असे सावंत बोलत होते.

Utpal Parrikar press conference today
भाजपने डावलल्यानंतर PWD मंत्र्यांनी केली अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा

'आप'ने उत्पल पर्रीकरांना देऊ केले तिकीट

भाजपने उत्पल यांना तिकीट नाकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गोव्याची निवडणूक लढवण्यासाठी आपमध्ये सामील व्हावे, अशी ऑफर आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिली. केजरीवाल यांनी त्यांचा हा प्रस्ताव जाहीरपणे मांडला. केजरीवाल यांनी एका खासगी वाहिनीचा व्हिडिओ ट्विट करून आपला प्रस्ताव मांडला. या व्हिडिओमध्ये उत्पल पर्रीकर यांचा पक्ष भाजप त्यांना त्यांच्या वडिलांच्या पणजी मतदारसंघातून कशी निवडणूक लढवू देत नाही हे सांगण्यात आले आहे.

Utpal Parrikar press conference today
उत्पल पर्रीकरांना डावलत बाबूश मोन्सेरात यांना पणजीमधून उमेदवारी जाहीर

मी लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी गोव्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 2016 मध्ये एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने पणजी मतदारसंघाचे तिकीट दिले आहे. आहे पण उत्पल यांना का दिले नाही असा प्रश्नही या संपुर्ण घडोमोडीकडे बघून उपस्थित होतो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com