Fact Check: विधानसभा निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशचे दोन राज्यात विभाजन होणार ?

uttar pradesh.jpg
uttar pradesh.jpg

उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असुन विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने भाजपमध्ये सभांच्या फेऱ्यामधुन सरकार आणि संघटनेत बदल होणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या दरम्यान उत्तर प्रदेशच्या विभाजनाबद्दलच्या मुद्दयांवर  सुद्धा चर्चा होत असल्याचे पहायला मिळते आहे. 2022 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्वांचल आणि बुंदेलखंड वेगळे होतील अशी शंका निर्माण करणारी माहिती सोशल मिडीयावर पसरते आहे. (Uttar Pradesh be divided into two states before the Assembly elections?)

व्हायरल होणऱ्या अशा माहीतीचे उत्तर प्रदेशच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने खंडन केले आहे. अशा बातम्या आणि माहीतीचा फॅक्ट चेक करीत माहिती विभागाने ट्विट करुन सांगितले कि, उत्तर प्रदेशच्या विभाजनाची बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल आहे. मात्र विभाजनाबाबत जी भीती व्यक्त केली जात आहे ती निराधार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणार्‍या बातम्या पसरविनाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com