Goa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

राज्यातील पंचायती, सभागृहे व आरोग्य केंद्रे मिळून दर दिवशी सरासरी 70 ते 80 जागी लसिकरण केले जात आहे.

पणजी: राज्यात लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत 61246 जणांचे लसीकरण झाले. मंगळवारी 58 कोरोना लसीकरण केंद्रांत (Vaccination Center) 14 ते 44 वयोगटातील नागरिक, 15 वर्षाखालील मुलांचे पालक, दिव्यांग व्यक्ती,  खलाशी, रिक्शा चालक. टॅक्सी चालक, मोटर सायकल पायलट आदींचा समवेश आहे. (Vaccinated 61000 people in eight days in goa )

राज्यातील विविध आरोग्य केंद्रात 45 वर्षावरील 3670  व्यक्तीनी लस घेतली. मंगळवारी एकूण 10049 जणांना लस देण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून 10 हजाराच्यावर लसीकरण होत आहे. ही दिलासदायक बाब. राज्यातील पंचायती, सभागृहे व आरोग्य केंद्रे मिळून दर दिवशी सरासरी 70 ते 80 जागी लसिकरण केले जात आहे.

Goa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त

दरम्यान, राज्यात मंगळवारी 14 कोरोना बाधितांचे निधन झाले. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनाबळींची संख्या 2859 झाली आहे. 957 कोरोनाबाधित बरे झाले तर 473 नवे कोरोना बाधित आढळून आले. 86 बाधितांनी इस्पितळातून डिस्चार्ज घेतला.

केंद्राकडून आणखी ४४ कोटी डोस 
केंद्र सरकारने आणखी 44 कोटी डोसची तातडीची ऑर्डर नोंदविली असून यात 25 कोटी कोव्हिशिल्ड व 19 कोटी कोव्हॅक्सिन लशींचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयानेच याबाबतची माहिती दिली. 

Goa: ''सरकारच्या कोविड व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करावी'...

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत राज्य सरकारांना केंद्र सरकारच सारे डोस मोफत पुरवेल, या पंतप्रधानांच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने कोरोना लसमात्रांची मोठी ऑर्डर नोंदवली आहे. 21 जून पासून 18 वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू होईल. केंद्रातर्फे राज्यांना मोफत लस पुरवठा होईल. खासगी रुग्णालयांना ज्या 25 टक्के लसी दिल्या जातील त्यांची किंमत लस उत्पादकांतर्फेच निश्चित करण्यात येईल असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या