गोव्यात 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण स्थगित...     

Vaccine.jpg
Vaccine.jpg

पणजी: राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) लसीचे डोस संपल्यामुळे स्थगित करण्यात आले असून राज्यात रविवारी 42 रूग्णांचा कोविडमुळे (Covid-19) मृत्यू झाला. तर राज्यात बारा ब्लॅक फंगसचे (Black Fungus) रूग्ण असल्याचे केंद्राने जाहिर केले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी यापूर्वी 32 हजार 470 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस गोव्याला मिळाले होते. ते डोस आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देण्यात येत होते. या वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी 36580 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस गोव्याला मंजूर झाले आहेत. जसे डोस उपलब्ध होतील, त्याप्रमाणे लसीकरण सुरू होईल.

45 वर्षावरील नागरिकांसाठीचे लसीकरण अद्यापही सुरू असून ज्यांनी कोणी लस घेतली नाही, त्यांनी ती जवळच्या आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन घ्यावी, असे डॉ. बोरकर यांनी यावेळी आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com