Goa Vaccination: 18 ते 44 'विशेष' वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात   

Goa Vaccination: 18 ते 44 'विशेष' वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात   
Vaccination.jpg

पणजी: राज्यातील 18 ते 44 वयोगटातील जाहीर केलेल्या विशेष गटातील नागरिकांना उद्या ता. 3 जूनपासून  कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) सुरू होत आहे . आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या लसीकरण कार्यक्रमानुसार उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील दिव्यांग व्यक्ती (Handicapped person),  गंभीर आजारी नागरिक (Critically ill citizens), नुकत्याच प्रसूत झालेल्या माता व दोन वर्षांखालील मुले असलेले पालक यांना लसीकरण होणार आहे. तर 7 जूनपासून रिक्षा, टॅक्सीचालक, पायलट व खलाशी यांना लसीकरण होणार आहे. (Vaccination for 18 to 44 special age groups begins in goa)

राज्यातील आरोग्य केंद्रामार्फत  स्थापन केलेल्या 37 केंद्रात हे लसीकरण सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. राज्यात यापूर्वी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा एक टप्पा पार पडला होता. हा दुसरा टप्पा आहे. राज्यातील विविध आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये हे लसीकरण होणार आहे.

डिचोली आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार  डिचोली येथे शांतादुर्गा विद्यालय डिचोली व नारायण झाट्ये कॉमर्स महाविद्यालय सर्वंणच्या जवळील सभागृहात उद्यापासून लसीकरण सुरू होणार आहे. दरदिवशी  200 लोकांना  लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले आहे .

उद्यापासून लसीकरण सुरू होत असल्याने  प्राधान्य असलेल्या दोन वर्षा खालील मुलांच्या पालकांनी मुलाचा जन्म दाखला  सोबत आणणे गरजेचे असून दिव्यांग व्यक्तींनी समाजकल्याण खात्यातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणावे लागेल. मधुमेह,  हृदयरोग विकार, उच्च रक्तदाब, कर्करोग ,  हे आजार असलेल्या रुग्णानी त्यांच्यावर चालू असलेल्या उपचाराची कागदपत्रे सोबत आणावी लागतील.  7  जूनपासून लसीकरण होणाऱ्या   टॅक्सीचालक, रिक्षाचालक, दुचाकी पायलट यांनी वाहन परवाना व वाहनाची कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत. खलाशांनी सरकारने दिलेले ओळखपत्र सोबत आणावे लागेल. 
 

असे होईल लसीकरण

3 ते 7 जून: दिव्यांग व्यक्ती, लहान बाळांच्या माता, 2 वर्षांखालील मुले असलेले पालक व  मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड विकार,  हृदय रोग,  उच्च रक्तदाब हे आजार असलेले 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती.

7 ते 15 जून:  रिक्षाचालक, टेक्सीचालक, मोटरसायकल पायलट व खलाशी.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com