Goa Vaccination: राज्यात आजपासून 87 ठिकाणी लसीकरण
Vaccination 1.jpg

Goa Vaccination: राज्यात आजपासून 87 ठिकाणी लसीकरण

पणजी: राज्यात (Goa) पालिका व पंचायत पातळीवर 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी टिका उत्सव 3 (Tika Utsav) या नावाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरे आयोजित करणे सुरु करण्यात आले आहे. राज्यात 87 ठिकाणी एकाचवेळी हे लसीकरण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Prime Pramod Sawant) यांनी दिली होती. (Vaccination at 87 places in the state from today)

समाज माध्यमांवर जनतेला संबोधित करताना ते म्हणाले, 45 वर्षे वयावरील 75  टक्के लस घेतली आहे. उर्वरीत जणांनी लस घ्यावी. अद्याप केवळ 30 टक्के जणांची लसीची पहिली मात्रा घेतली आहे. कोविडची तिसरी लाट आणि त्या लाटेचा प्रादर्भाव बालके व किशोर वयीन मुले यांना जाणवण्याची शक्यता गृहित धरून स्तनदा माता, सहव्याधी असणारे, 15 वर्षांखालील मुलांचे पालक यांना लसीकरणात प्राधान्य दिले. गेले आठ दिवस अशा लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ते म्हणाले, 18 वर्षांवरील सर्व वयोगटासाठी रविवारपासून  लसीकरण सुरु केले जाणार आहे. पालिका व पंचायतवार याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. जनतेने आपल्या पालिकेत व ग्राम पंचायतीत केव्हा लसीकरण आहे हे जाणून घेऊन तेथे जाऊन लस घ्यावी. लस सर्वांना मिळणार असल्याने लस घेण्यासाठी मोठी गर्दी करू नये. प्रत्येक केंद्रावर किती लसी द्याव्‍यात ते ठरवून दिले आहे. त्यामुळे सर्वाना लस मिळेल अशी व्यवस्था केली आहे.  या लसीकरणासाठी कोणतीही पूर्वनोंदणी नाही. आधार कार्ड सोबत नेऊन ही लस घेता येईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com