जुन्या गोव्यातील जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्तचे 'व्हडलेमिस' सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत सुरू

Novena of the world famous St Francis Xavier Fest in Old Goa started online
Novena of the world famous St Francis Xavier Fest in Old Goa started online

पणजी :  जुन्या गोव्यातील जगप्रसिध्द असलेले सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त आज असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाची रोज होणारी (नोवेना) प्रर्थना सभा  ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आज 10 वाजून 30 मिनीटांनी व्हडलेमिस सुरू झाली यावेळी चर्चमध्ये  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पीडब्ल्यूडी मंत्री दीपक पौस्कर, आमदार चर्चिल अलेमाओ, कुरिटोरिमचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, फोर्टोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, पोरवोरिमचे आमदार रोहन खौंटे, नावेलीमचे आमदार लुझिन्हो फलेरो, सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस आणि अनेक स्थानिक मुख्य लोक आज होणाऱ्या प्रार्थनेसाठी उपस्थित आहेत.


जगात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुने गोवे चर्चला दरदिवशी सुमारे पाच हजारांहून अधिक पर्यटक भेट देतात. या चर्चच्या आवारात कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भेट देणाऱ्या पर्यटकांची नोंद केली जात आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. फेस्तनिमित्त येत्या २४ नोव्हेंबरपासून नोव्हेना (प्रार्थना) सुरू झाली असून पहिल्यांदाच ऑनलाईनद्वारे त्या होत आहे.

 दरवर्षी या जुने गोवे फेस्तासाठी देश - विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या चर्चच्या आवारात फेस्ताच्या दिवशी भाविक लाखोच्या संख्येने भेट देतात. राज्यातील कानकोपऱ्यातून ख्रिश्‍चन बांधव नोव्हेनासाठी दरवर्षी पस्थिती लावतात, मात्र कोविड महामारीच्या मार्गदर्शक सूचनांमुळे त्यांना यावर्षी उपस्थिती लावता येणार नाही. या फेस्तानिमित्त नोव्हेना सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती गोमंतकियांपर्यंत आगाऊ कळविली गेली आहे. 

या फेस्तानिमित्त वाहतूक पोलिसांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. फेस्ताला ख्रिश्‍चन बांधवांचा दरवर्षीप्रमाणे महापूर लोटला जाणार नसल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याची तेवढी आवश्‍यकता नाही असा पोलिसानी मत व्यक्त केले. मात्र आज पर्यटक व स्थानिक लोकांची उपस्थिती वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

जुने गोवे चर्चच्या परिसरात पर्यटकांना प्रवेश देताना कोविड मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती केली जात आहे. चर्चमधील वस्तूंना हात लावण्यास मनाई केली जात आहे. पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ केली आहे. दरवर्षी फेस्तानिमित्त स्थानिक तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात फेरीवाले येतात मात्र यंदा त्यांना परवानगी दिली गेली नाही. या ठिकाणी आरोग्य सेवा, पोलिस मदत तसेच प्रवासी वाहतूक सेवा तसेच पार्किंग व्यवस्थेसंदर्भातचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com