Mrs. Unity Queen of India: बेळगावमधील सौंदर्य स्पर्धेत गोव्याची ऋषाली सामंत विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

श्रीकी क्रिएशनतर्फे विवाहित महिलांसाठी बेळगाव येथे आयोजित केलेल्या ‘मिसेस युनिटी क्वीन ऑफ इंडिया’ (क्लासिक विभाग) या सौंदर्य स्पर्धेत म्हापसा येथील ऋषाली हृषीकेश सामंत यांनी विजेतेपद प्राप्त केले आहे.

म्हापसा : श्रीकी क्रिएशनतर्फे विवाहित महिलांसाठी बेळगाव येथे आयोजित केलेल्या ‘मिसेस युनिटी क्वीन ऑफ इंडिया’ (क्लासिक विभाग) या सौंदर्य स्पर्धेत म्हापसा येथील ऋषाली हृषीकेश सामंत यांनी विजेतेपद प्राप्त केले आहे. बेळगाव येथे हॉटेल इफा येथे या स्पर्धेची भव्य अंतिम फेरी पार पडली. ऋषाली सामंत यांना ‘युनिटी क्वीन ऑफ इंडिया (क्लासिक विभाग)’ विजेती म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत बेळगाव येथील डॉ. शोभा या प्रथम उपविजेत्या, तर बंगळु्रू येथील शिवानी हर्डीकर या द्वितीय उपविजेत्या ठरल्या.

अमृतमोहोत्सव: नवभारत निर्माणकरीता प्रयत्न व्हावेत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

या स्पर्धेत विजेती ठरल्याने ऋषाली सामंत यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सामंत या व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट असून गेली वीस वर्षे त्या या व्यवसायात आहेत. सौंदर्यतज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना या क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून. सौंदर्यविषयक विविध उपक्रमांत सहभाग घेऊन त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चे कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. अंतिम स्पर्धेसाठी अनेक फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारताची परंपरा आणि संस्कृती’ या विषयावर स्पर्धकांनी सादर केलेले फोटोशूट व व्हिडियो तसेच प्रत्यक्ष स्पर्धेवेळी स्पर्धकांनी सादर केलेले सादरीकरण व बौद्धिक चुणूक व्यक्त करणारी प्रश्नोत्तरे या माध्यमातून या स्पर्धेची विजेती निश्चित करण्यात आली.

वास्को ट्रेन अपघात: जाको राखे साइयां, मार सके न कोय व्हिडिओ व्हायरल 

गोव्याबरोबरच कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड येथील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयुशमान हॅल्पिंग फौंडेशनच्या रूपाली होसकोटी, एस. एल. व्ही. ग्रुपचे व्यवस्थापक विनोद दाभाळे व आयकॉनिक प्रॉडक्शनचे आंतरराष्ट्रीय सहयोगी लेडर वॉरेन आणि सौरभ वाकल यांचे विशेष साहाय्य लाभले. 

संबंधित बातम्या