वाळपई क्रीडा मैदानाचे काम अपूर्ण अवस्थेत

valpoi ground
valpoi ground

वाळपई

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील पालिका मैदानाचे काम पूर्ण कधी होणार, असा सवाल क्रीडाप्रेमी करीत आहेत. ठाणे मार्गावर असलेल्या जुन्या पालिका मैदानाचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले होते. पण, दोन वर्षे उलटली तरीही काम पूर्ण होण्याचे नाव काढीत नाही, अशी अवस्था बनलेली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमीत नाराजीचा सुरू व्यक्त होतो आहे.
या मैदानाचे दुरुस्तीकाम हाती घेतल्यानंतर मैदानाला चारही बाजूंनी लोखंडी उंच असे कूंपण घातलेले आहे. तसेच मैदानात मातीचा भराव टाकून जमीन चांगली समांतर करण्यात आलेली आहे. पण, अजूनही मैदानाला हिरवळ घातलेली नाही. त्यामुळे मैदानाचे काम अर्धवटच राहिलेले आहे. हिरवळ घातलेली नसल्याने क्रिडा प्रेमा सद्या लाल मैदानावरच खेळत आहे. या मैदानाला हिरवळ घातल्यानंतरच मैदान चांगले सुसज्ज असे बनणार आहे. सध्या मैदानावर खेळणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे या मैदानाला हिरवळ घालून काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. वाळपई पालिकेचे हे जुने मैदान आहे. याआधी मैदान उघड्या स्थितीत होते. त्यामुळे मैदानाला संरक्षणाचे कवच नव्हते. आता पहिल्या टप्यातील काम पूर्ण केल्याने कवच प्राप्त झाले आहे. पण, अंतिम काम मात्र पूर्ण झालेले नाही. वाळपई शहरातील युवकांना खेळण्यासाठी चांगले मैदान उपलब्ध झाले पाहिजे. ती नितांत गरज आहे. कारण अन्य मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे पालिका मैदानावरच क्रीडाप्रेमींना अवलंबून रहावे लागते आहे. वाळपई पालिकेने मैदान दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते पूर्णत्वास नेले पाहिजे. पहिला टप्पा कामाचा पूर्ण केला आहे. आता अंतिम हिरवळ मैदानाला घालण्याची बाकी आहे. ते काम केल्यास मैदानाला वेगळे रुप मिळेल व सुसज्ज मैदान प्राप्त होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com