
वाळपई : म्हाऊस पंचायत क्षेत्रातील म्हाऊस गावात गेल्या पंधरा दिवसापासून नळ कोरडे असल्याने गावातील लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यात टॅंकर आठ दिवसातून एकदा येत असल्याने गावातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे. नदीचे पाणीही आटले असून ग्रामस्थांना पाण्याविना दिवस काढावे लागते आहेत.
वारंवार पाणी टंचाईची तक्रार संबंधित खात्याला व पाणी सोडण्याऱ्या आॅपरेटर कडे केली जाते. त्यानंतर एक दिवस पाणी नीट सोडले जाते व टॅंकर पाठविला जातो. मात्र पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’, असा प्रकार असतो. काही वेळेला क्षमता नसल्याने जलवाहिनी फुटते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.
अनुसया देसाई म्हणाल्या आमची काही घरे उंचावर आहेत, तेथील नळांना पाणी चढतच नाही. त्याचबरोबर आठ आठ दिवस टॅंकरच नसतो. त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला मोठे त्रास सहन करावे लागत आहेत. दोन दोन दिवस आंघोळीविना रहावे लागत आहे.
नळाला पाणी नाही निदान टॅंकरद्वारे तरी सुरळीत पाणी पुरवठा असावा अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर दिवसाला किमान २-३ तास तरी पाणी सोडावे, त्याचबरोबर दोन दिवसांनी तरी टॅंकरने पाणी पुरवठा करावा व जी लहान जलवाहिनी हटवून नवीन घालण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थ महिलांतर्फे करण्यात आलेली आहे.
विकतचेच पाणी
काही घरे उंचावर असल्याने त्या घरांना नळाचे पाणी चढत नाही. व पाणी पोहचत नाही. तसेच टॅंकर नियमित येत नसल्याने महिलांना मोठे संकट व त्रास सहन करावा लागतो, काही महिलांनी सांगितले की पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत आणून पाणी पिण्याची वेळ आलेली आहे.
चंदा गावकर म्हणाल्या पंधरा दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे, यासंबंधी वारंवार तक्रार केली.मात्र पुन्हा तोच प्रकार होत आहे. मे महिना असल्याने नदीही आटली आहे. त्यामुळे आम्ही पाण्यासाठी कुठे जावे हेच कळत नाही. टॅंकरही आठ दिवसाने पाठविला जातो.
पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास पुन्हा मोर्चा ! वाळपई पाणी पुरवठा कार्यालयावर म्हाऊस येथील महिलांनी धडक दिली. मात्र कार्यालयात सहाय्यक अभियंता रोहिदास नाईक रजेवर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, तेथे असलेल्या अधिकाऱ्यांना यासंबंधी विषयी लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिले.
यावेळी देसाईवाडा व पंचायत वाड्यावरील सुमारे २० महिलांची उपस्थिती होती. गावातील महिलांतर्फे तक्रारीचे निवेदन देण्यात आले. जर सुरळीत पाणी पुरवठा झाला नसेल तर गावातील सर्व महिलांतर्फे कार्यालयावर पुन्हा मोर्चा घेऊन येणार, असा इशाराही देण्यात आला आहे.
नळाला पाणीच येत नाही. तसेच जलवाहिनी फुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यासंबंधी जलवाहिनी फुटल्याबद्दल विचारणा केली जाते, तेव्हा उच्च दाबाने पाणी सोडल्यामुळे जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडतो, असे आॅपरेटर सांगतो. जर ही जलवाहिनी लहान आहे तर सरकारने ती हटवून दुसरी घालण्याची व्यवस्था करावी व आम्हाला नियमित पाणी पुरवठा करावा. - तुळशी गावकर, गृहिणी-म्हाऊस
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.