गोव्यात आज बिरसा मुंडांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम

बिरसा मुंडांच्या सन्मानार्थ गोव्यात विविध ठिकाणी 75 कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे.
गोव्यात आज बिरसा मुंडांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम
गोव्यात आज बिरसा मुंडांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमDainik Gomantak

सासष्टी: इंग्रजांच्या राजवटीपासून आदिवासी लोकांच्या हितासाठी लढणाऱ्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा (Birsa Munda) यांच्या सन्मानार्थ 15 नोव्हेंबर रोजी देशात तसेच गोवा (Goa) राज्यात जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त देशात 75 लाख तर गोव्यात विविध ठिकाणी 75 कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यात भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम दिवसभर सुरू राहणार आहे, अशी माहिती भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गोव्यात आज बिरसा मुंडांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम
नगरनियोजन पेडणे कार्यालयात शुकशुकाट, मंत्र्यांचे दुर्लक्ष

आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकेचे स्मरण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंडा हे आदिवासी समुदायातील असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, परिणामी त्यांनी लोकांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात आवाज उठविला आणि त्यांचे नाव जगभर प्रसिद्ध झाले, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com