पिसुर्ले नवदुर्गा मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाला सुरुवात

खणा नारळानी देवीची ओटी भरून नवस फेडण्यासाठी भाविकांची (devotees)वर्दळ सुरू असते.
पिसुर्ले नवदुर्गा मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाला सुरुवात
पिसुर्ले येथिल मंदिरात नवरात्रोत्सव निमित्ताने सजवलेला देवीचा कळसDainik Gomantak

पिसुर्ले: सत्तरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पिसुर्ले येथिल श्री नवदुर्गा मंदिरात नवरात्रोत्सव कार्यक्रम सुरू झाला असून, घटस्थापने (Ghatsthapana)पासून सुरू झालेला हा कार्यक्रम विजया दशमी पर्यंत सुरू राहणार आहे.

या निमित्ताने सकाळी मंदिरात देवीची विधिवत पूजा करून, दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कापड परिधान करून गर्भकुडीतील देवीचा कळस सजवला जातो, त्यानंतर रात्री वेगवेगळ्या वाड्यावरील नागरिकांतर्फे पुरस्कृत विविध सांस्कृतिक (Cultural)कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामुळे या गावात सुमारे दहा दिवस भक्तीमय वातावरणात पसरलेले असते.

पिसुर्ले येथिल मंदिरात नवरात्रोत्सव निमित्ताने सजवलेला देवीचा कळस
Goa: पिसुर्ले शिंगणे येथील बसस्टॉपची दुरावस्था

यावेळी राज्यातील विविध भागांतील नागरिक मंदिरात उपस्थित राहून, देवींचे दर्शन घेत असतात व खणा नारळानी देवीची ओटी भरून नवस फेडण्यासाठी भाविकांची वर्दळ सुरू असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com