Damodar festival: वास्को नगरी सज्ज;आजपासून दामोदर सप्ताह प्रारंभ

दामोदर भजनी सप्ताह यंदा सार्वजनिकरीत्या होणार साजरा
Damodar Bhajani fest
Damodar Bhajani festDainik Gomantak

वास्को: दामोदर भजनी सप्ताहासाठी वास्को नगरी सज्ज झाली असून, उद्या बुधवारी दुपारी 12 वाजता दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करून अखंड 24 तासाच्या दामोदर भजनी सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. अशोक मांद्रेकर यांच्या ''जय जय राम कृष्ण हरी'' च्या गजराने भजनाला सुरवात होईल.

( Vasco city ready for 'Damodar Bhajani week program' )

Damodar Bhajani fest
Souza Lobo Restaurant Case: गजेंद्र सिंग याचा जामीन नाकारला

दामोदर भजनी सप्ताह यंदा सार्वजनिकरीत्या साजरा होणार असल्याने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहरात फेरी भरणे काम सुरू झाले. त्यानुसार गेल्या दोन वर्षानंतर शहरात फेरी दिसली. तसेच पूर्वी घरोघरी होणारी लगबग ही दिसली. दरम्यान, यंदा मंदिराकडे येणारे पार मात्र उत्सव समिती बाजारकारांचा वगळता इतर समाजाचे दिसणार नाहीत.

दामोदर भजनी उत्सव समिती आणि इतर समाजाच्या पार समित्यांमध्ये समन्वयकांच्या अभावामुळे बोलणी फिस्कटली व इतर पार वाल्यांनी उत्सव समितीने विश्‍वासात न घेतल्याने यंदा आपण पार करणार नसल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले.

Damodar Bhajani fest
पणजी मनपाचे बायो-मिथेनेशनचे 6 प्रकल्प पाणी-विजेपासून वंचित

त्यानुसार दैवज्ञ ब्राह्मण, मुरगाव पतन्यास फैलवाले समाज, नाभिक समाज, राम विश्वकर्मा समाज, गाडेकर समाज यांचे पार मंदिराकडे येणार नाहीत. तसेच सप्ताह काळात रात्रीच्या वेळी शहरात होणाऱ्या गायनाच्या मैफिली होणार नाहीत. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. कारण यंदा वास्कोवासीय तसेच इतर ठिकाणाहून येणारे भाविक पार मिरवणुकांना तसेच गायनाच्या मैफिलींना मुकणार आहेत.

नागरिक सज्ज

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे विरजण पडलेल्या दामोदर भजनी सप्ताह यंदा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यासाठी वास्कोवासीय सज्ज झाले आहेत. त्यासाठी वास्को शहरात गेले दोन आठवडे तयारी सुरू होती. यात दामोदर भजनी बाजारकार उत्सव समितीने बैठका घेऊन भजनी सप्ताहात कोणतीच कमतरता भासणार नाही, याची दखल घेतली आहे. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेविषयी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय, निमसरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या.

गायनाच्या मैफली

यंदा दामोदर भजनी सप्ताहात फक्त दोनच गायनाच्या मैफिली होणार आहेत. पहिल्या मैफिलीची बैठक उद्या (3 रोजी) रात्री 10 ते 11:30 वाजेपर्यंत नटराज थिएटरजवळ होणार आहे. या बैठकीत ऋषिकेश बडवे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना दत्तराज सुर्लकर (हार्मोनियम), शैलेश गावकर (तबला), किशोर तेली (पखवाज) व योगेश रायकर (मंजिरी) साथसंगत करणार आहेत. दुसरी बैठक जोशी चौकात रात्री 1 वाजता सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com