वास्कोतील तीन हजार रोपटी हटविल्याची वन खात्याकडे तक्रार

प्रतिनिधी
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

एलमाँत थिएटर ते जेटीपर्यंतच्या मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेली सुमारे ३००० रोपटी काढण्यात आली.

मुरगाव: एलमाँत थिएटर ते जेटीपर्यंतच्या मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेली सुमारे ३००० रोपटी काढण्यात आली. यासंबंधीची तक्रार सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी वन खात्याकडे केली आहे. तक्रारीची प्रत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहे.

मुरगाव बंदरापर्यंत जाणाऱ्या महामार्गावर बंदराच्या दिशेने गेल्या वर्षी जेटी ते एलमाँत थिएटरपर्यंतच्या सुमारे दोन मीटर अंतरावर ही रोपटी लावण्यात आली होती. रोपटी काही प्रमाणात मोठी झाल्यावर ती कुणाच्याच ध्यानीमनी नसताना अज्ञातांनी हटविली. याप्रकरणी सडा येथील वृक्षप्रेमी बालन चोडणकर यांनी सर्वप्रथम आवाज उठवून हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांतून केलेला खर्च वाया घालविणारा आहे, असे मत व्यक्त केले होते. यासंबंधीचे वृत्त दै. 

‘गोमन्तक’मधून प्रसिद्ध झाल्यावर अनेक जागृत नागरिकांनी लावलेली रोपटी हटविल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली.
 

संबंधित बातम्या