
मडगाव : रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्यात जलवाहतुकीला पर्याय म्हणून पुढे आणण्यात येणार आहे. त्यासाठी वास्को-दोनापावल फेरीसेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती जल परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. मडगावमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मडगावात पत्रकारांशी या विषयावर बोलताना फळदेसाई म्हणाले, ही सेवा एवढ्या लवकर सुरू होणार नाही. आधी यासाठी चांगल्या फेरीबोटी आणाव्या लागतील. या फेरीबोटी पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या असतील. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. अन्य जलमार्गाचाही वापर करता येईल का हे पाहिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुभाष फळदेसाई हे पुरातत्व खात्याचेही मंत्री असून पुरातत्व खात्यातील जुने दस्तऐवज डिजिटलाईज करून ठेवण्यात येणार असून त्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सांगे मतदारसंघात पर्यावरणपूरक उद्योग आणण्यावर भर दिला जाणार आहे. या अंतर्गत ट्रायबल हॅण्डलूम व्हीलेज उभारले जात असून त्याद्वारे सुमारे हजारभर युवा युवतींना रोजगार प्राप्त होणार असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.