वास्कोत पत्रे घालून रस्ता अडवला; ‘गोवा फर्स्ट’ची तक्रार

वास्कोचे जुने मासळी मार्केट पाडून त्याजागी नवीन मासळी मार्केट उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
वास्कोत पत्रे घालून रस्ता अडवला; ‘गोवा फर्स्ट’ची तक्रार
Road is blockedDainik Gomantak

वास्को : सार्वजनिक रस्त्यावर पत्रे घालून रस्ता अडवून काम सुरू ठेवल्याबद्दल ‘गोवा फर्स्ट’ या बिगर सरकारी संस्थेने जीसुडाविरुद्ध मुरगाव उपजिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम रस्ते विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

Road is blocked
म्हापशात ‘बाटा’ शूजच्या गोदामास आग

वास्कोचे जुने मासळी मार्केट पाडून त्याजागी नवीन मासळी मार्केट उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम जीसुडाअंतर्गत करण्यात येत आहे. त्सासाठी जीसुडाने मासळी मार्केट प्रकल्पाच्या बाजूस असलेला सहा मीटर रुंदीचा रस्ता पत्र्यांचे आवरण घालून अडवला आहे. ज्यामुळे या रस्त्यावरून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

याविषयी गोवा फर्स्टने आवाज उठवून जीसुडाने सार्वजनिक रस्त्यावर नाकाबंदी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला असल्याकडे लक्ष वेधले आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम तसेच उपजिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीच परवानगी नसल्याने हे बेकायदेशीर रस्त्यावरील अतिक्रमण जीसुडाला काढून टाकण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे. पत्र्याची कमान तातडीने हटवून प्रवाशांना रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com