वास्को मासे विक्रेत्यांचा नवा निवारा त्रासाचा!

शेडमध्येच येते पावसाचे पाणीः डासांमुळे डेंग्यू,मलेरियासम रोगांना आमंत्रण
वास्को मासे विक्रेत्यांचा नवा निवारा त्रासाचा!
Vasco Fish MarketDainik Gomantak

वास्को : नवीन बांधलेल्या शेडमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यातून डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे. त्यातून डेंग्यू, मलेरिया सारखे रोग पसरण्याची भीती येथील मासळी विक्रेत्यांनी तसेच मासळी नेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी व्यक्त केली आहे. यावर तातडीने उपाययोजना आखावी, अशी मागणी होत आहे.

मासळी विक्रेत्यांचे नव्या शेडमध्ये स्थलांतर झाल्यानंतर मासळी विक्रेत्यांना अनेक समस्या जाणवल्या आहेत. यात मुख्य म्हणजे या निवाऱ्याच्या मध्यभागी असलेल्या खुल्या जागेत पावसाचा पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने तिथे तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखी रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याआधी पालिकेने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तेथील भलेमोठे वृक्षही येथील विक्रेत्यांना तसेच या शेडमध्ये येणाऱ्यांसाठी धोकादायक आहेत.

Vasco Fish Market
राहुल गांधी ED केसचे पडसाद गोव्यात; GPCC अध्यक्षांसह कार्यकर्ते ताब्यात

मासळी विक्रेत्यांनी या शेडमध्ये येण्यापूर्वी पालिकेला या झाडांच्या धोकादायक फांद्या छाटून टाकण्याची विनंती केली होती. मात्र त्या फांद्या तशाच असून त्या या शेडमधील मासळी विक्रेत्यांबरोबर मासळी नेण्यासाठी येणाऱ्या लोकांना घातक ठरत आहे. काल सकाळी याच एका झाडाची फांदी एका महिलेवर पडल्याने तिला किरकोळ स्वरूपाची दुखापत निभावली असल्याचे मासे विक्रेत्यांनी सांगितले. अन्यथा मोठ्या अनर्थ घडला असता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com