Goa Cruise Terminal: गोवेकरांची गैरवर्तणूक अन् गुंडगिरी आली अंगलट; फ्रान्‍सची 3 क्रुझ जहाजे रद्द होण्याची दाट शक्यता

Goa Cruise Terminal: आंतरराष्ट्रीय क्रुझ लायनर्सनी गोव्याला त्यांच्या टूर डेस्टिनेशनमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
Cruise | Goa Vasco Mormugao Cruise Terminal
Cruise | Goa Vasco Mormugao Cruise TerminalDainik Gomantak

Goa Cruise Terminal: मुरगाव क्रुझ टर्मिनलवर नुकत्याच झालेल्या फसवणुकीमुळे गोव्याचा जागतिक पातळीवर वाईट संदेश गेला आहे. टॅक्सीचालक आणि अधिकारी यांच्यातील गोंधळ, गैरसंवादामुळे अमेरिकन पर्यटकांना मन:स्‍ताप सहन करावा लागला.

दरम्यान, त्यामुळे आता जागतिक स्तरावर क्रुझ पर्यटन क्षेत्रात साखळी निर्माण होऊ लागली आहे. मिळालेल्‍या विश्वसनीय सूत्रांनुसार, काही फ्रान्‍स क्रुझ लाईन जहाजे मुरगाव बंदरात येणार होती, त्यांनी आता गोव्याला क्रुझ पर्यटनाच्या दृष्टीने काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

एका क्रुझ लाईन कंपनीच्या प्रतिनिधीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अमेरिकन पर्यटकांना दिलेली गैरवर्तणूक आणि स्थानिक टॅक्सीचालकांनी केलेली गुंडगिरी लक्षात घेऊन तीन आंतरराष्ट्रीय क्रुझ लायनर्सनी गोव्याला त्यांच्या टूर डेस्टिनेशनमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

या कंपन्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी सरकारच्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही क्रुझ लाईन कंपन्यांशी संपर्क साधून त्‍यांना चांगले आदरातिथ्याचे आश्वासन दिले.

Cruise | Goa Vasco Mormugao Cruise Terminal
Goa Petrol Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या किमतीत किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

दोषींवर होणार कारवाई

बुधवारी मुरगाव बंदरात घडलेल्या प्रकाराने गोव्याच्या पर्यटन हंगाम संकटात सापडला आहे. मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर यांनी तर या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. तर, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असे प्रकार आता खपवून घेणार नसल्‍याचे सांगतानाच बुधवारी घडलेल्‍या प्रकरणातील दोषींवर सक्त कारवाई करण्‍याचा इशारा पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com