लैंगिक अत्याचार प्रकरणी बिहारच्या संशयिताला वास्को पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संशयित गोव्यातून पळून गेल्याचे तपासात उघड
Vasco police arrest Bihar suspect in sexual assault case
Vasco police arrest Bihar suspect in sexual assault caseDanik Gomantak


वास्को : भाडेकरूंच्या पडताळणी फॉर्ममधील महत्त्वाच्या सुचनांमुळे बिहारपासून केरळपर्यंत आंतरराज्य पाटलाग करून संशयित मनजित कुमार (वय 21, रा. बिहार) याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी वास्को पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात 376 आयपीसी कलम 82 आणि कायद्याच्या कलम 48 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. (Bihar suspect arrested in sexual assault case)

Vasco police arrest Bihar suspect in sexual assault case
मडगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित गोव्यातून पळून गेल्याचे तपासात उघड झाले होते. नंतर पोलिसांनी भाडेकरूंची पडताळणी केली. यात संशय असणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली. मूळचा खरसारी बिहारचा रहिवासी असलेला एकजण पळून गेला होता. वास्को पोलिसांच्या पथकाने आरोपीचा पाठलाग सुरूच ठेवला होता. बिहार, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून आरोपीचा पाठलाग केला आणि शेवटी केरळमध्ये बालूसेरी येथे लपून बसलेल्या मनजित कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com