Vasco Police: दाबोळीत तीस हजाराचा गांजा बाळणाऱ्या एकाला अटक

वास्को पोलिसांनी केली कारवाई
NDPS Act
NDPS Act Dainik Gomantak

गोव्यात सध्या पोलिसांनी ड्रग्ज तस्करीविरोधात कारवाई तीव्र केली आहे. यामूळे राज्यात प्रत्येक दिवशी अमली पदार्थ विक्री आणि व्यापाराविरोधात पोलिसांची कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वास्को पोलिसांनी आज 150 ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी वास्को येथील अब्बाल शेख याला अटक केली आहे.

(Vasco police arrest narcotic supplier Abbal Sheikh in Dabolim)

NDPS Act
Goa Crime: आमदार लोबोंचा गोवा सरकारला घराचा आहेर; किनारी भागात गुन्हेगारी वाढली

मिळालेल्या माहितीनुसार आज वास्को पोलिसांनी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 ) आज एकावर गुन्हा नोंदवला.

रात्री 10 ते 11 यावेळेत शांतीनगर वास्को येथील अब्बाल शेख याने तीस हजार किमतीचा 150 ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही सर्व कारवाई आयएनएस हंसाजवळ दाबोळी परिसरात करण्यात आली आहे. या कारवाई वेळी पोलिसांनी काळ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा स्कूटरही जप्त केली.

NDPS Act
Mobile Connectivity in Goa : खोतीगावात मोबाईल कनेक्टिव्हिटीमुळे फुलले हास्य

वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार(दि.२) रात्री दाबोळी राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूलाखाली हंसा गेट समोर अज्ञात व्यक्ती गांजा घेऊन येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानूसार पोलिस उपनिरीक्षक नागेशकर व इतर पोलिसांनी उड्डाणपुलाखाली सापळा रचून दुचाकी(जीए 6 जे 5050) वरून आलेल्या वास्को शांतिनगर येथील अब्बास इद्दीन शेख(18) याची झडती घेतली. शेख यांची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे 150 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत तीस हजार रुपये होत आहे. गांजा प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक मांतोडकर करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com