वास्कोत दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या

आरोपीकडून एका चोरीच्या दुचाकीसह 4 मोबाईलही हस्तगत
वास्कोत दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या
Vasco Bike TheftDainik Gomantak

वास्को : वास्कोत मुरगाव पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. गांधीनगर वास्को येथील 22 वर्षीय विकासकुमार सरोज, मूळचा यूपीचा रहिवासी असून त्याला चोरीच्या आरोपातून अटक केली आहे. मुरगाव पोलिसांनी आरोपीकडून 4 मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे. (Vasco Bike Theft News Update)

Vasco Bike Theft
Goa Election: भाजपची पहिली उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार?

मुरगाव पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर हे कर्मचार्‍यांसह गस्त घालत होते. यावेळी त्यांनी विकास कुमार सरोज या 22 वर्षीय युवकास सीडी डॉन होंडा दुचाकीवर नंबर प्लेट नसताना पकडले. चौकशीनंतर केलेल्या तपासात त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

Vasco Bike Theft
मनोज परब रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

वास्को (Vasco) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोपीला वास्को पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. कलम 41 अन्वये आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास (Enquiry) मुरगाव पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com