लोकांची फसवणूक करत कर्ज मिळवल्या प्रकरणी एकाला केली अटक

बनावट कागदपत्राद्वारे बँकेला फसवणाऱ्या एकाला वास्को पोलिसांनी केली अटक
Goa News
Goa News Dainik Gomantak

वास्को; लोकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर कर्ज मिळवल्या प्रकरणी वास्को पोलिसांनी सनील देसाई याला अटक केली. आतापर्यंत वास्को पोलिस ठाण्यात त्याच्या नावे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अशाच प्रकारच्या आणखी तक्रारी प्राप्त होण्याची शक्यता असून त्या प्राधान्याने विचारात घेवून आरोपीवर कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले. ( Vasco police have arrested a man for defrauding a bank through forged documents )

फ्लॅटसंबंधीचे बनावट विक्री कागदपत्रे तयार करून येथील सिटिझन्स क्रेडिट को-ऑप. बँक लिमिटेडकडे तारण ठेऊन कर्ज घेऊन बँकेची फसवणुक करणाऱ्या सनिल एस. देसाई याला वास्को पोलिसांनी अटक केली. त्याला चार दिवसांचा पोलिस कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे.

Goa News
ISL Football Tournament : साहिल ताव्होरा यापुढेही हैदराबादसोबतच

फ्लॅटसंबंधीचे बनावट विक्री कागदपत्रे तयार करून बँकेची फसवणुक करून कर्ज घेतल्याप्रकरणी सिटिझन्स क्रेडिट को-ऑप. बँक लिमिटेडचे व्यवस्थापक आगुस्तिन फर्नांडिस यांनी वास्को पोलिस स्थानकामध्ये ५ फेब्रुवारी २०२१ला तक्रार नोंद केली होती. १२ मे २०१४ मध्ये उदय देसाई व सनिल देसाई यांनी बँकेकडे दाबोळी येथील दोन फ्लॅट तारण ठेऊन बँकेकडून २९ लाख ४८ हजार रुपयांचे तारण कर्ज घेतले होते.

सदर कर्ज उदय देसाई याच्या नावावर घेण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी जे कागदपत्रे बँकेला सादर केली होती. ती कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आल्यावर तक्रार करण्यात आली. फसवणुकीचा कट रचून बँकेकडून कर्ज घेतले. ते कर्ज फेडले नाही.याप्रकरणी तक्रार दाखल होताच ते बेपत्ता झाले.

Goa News
पंचायत निवडणूक : न्यायालयाच्या निकालाचे युरी आलेमाव यांच्याकडून स्वागत

दरम्यान दोन दिवसांपूर्वी मडगाव येथील जिल्हा इस्पितळ आवारात कोणीतरी सनिल देसाई याला पाहिल्यावर वास्को पोलिसांना माहिती दिली. सदर माहिती मिळताच वास्को पोलिस पथकाने तेथे जाऊन त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. वास्को पोलिस स्थानकामध्ये योग्य ते कायदेशीर सोपस्कार करून त्याला अटक करण्यात आली.

दुसऱ्या एका फसवणुकी प्रकरणी वास्को न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला अटक करण्यात येणार आहे. आपल्या सह्यांचा दुरुपयोग करून आपली फसवणुक केल्याप्रकरणी अभिषेख कुमार राय यांनी तक्रार केली होती. सनिल याने अभिषेक यांच्याशी मैत्री केल्यावर त्याला आपल्या वैयक्तिक कर्जासाठी बँकेला हमीदार राहण्याची विनंती केली. त्यानूसार अभिषेक याने कागदपत्रे न पाहताच सह्या केल्या. सनिल याने सह्या घेताना दुसरया व्यक्तीच्या कर्जाच्या कागदपत्रांवर हमीदार म्हणून अभिषेकच्या सह्या घेतल्या.

त्या कागदपत्राचा वापर करून सनिल याने कालिका अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीकडून विकास बिचोलकर याच्या नावावर 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले. दाबोळी येथील प्रत्येकी ४५ चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन फ्लॅट विकत घेण्यासाठी त्या सोसायटीकडून कर्ज घेतले होते.

या प्रकरणी सदर सोसायटीकडून कर्जाच्या हप्त्याप्रकरणी अभिषेक राय याला नोटिसा येऊ लागल्यावर त्याला सत्य परिस्थिती कळाली. वास्कोचे उपअधीक्षक राजेश कुमार व निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर, स्वप्निल नाईक, हवालदार दामोदर मयेकर, संतोष भाटकर, सचिन बांदेकर, शिपाई रोहन गोवेकर व गौरिश सातार्डेकर यांनी सनिल याला अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com