Vasco: पोलिस पथकाकडून 76 हजारांचा अमली मुद्देमाल जप्त

वास्को पोलिसांनी (Vasco Police) केलेली ही दुसरी कारवाई असून दोन दिवसात एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आली आहे.
Vasco Police
Vasco PoliceDainik Gomantak

Vasco: वास्को पोलिसांच्या पथकाने अमली पदार्थांविरुध्द कारवाई करताना छापा टाकून आरोपी सोहेल खान बंगाली रा. राजासाब खान, 19 वर्ष रा. खारीवाडा, वास्को याला अटक केली व त्याच्याकडून 760 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे 76 हजार रुपये आहे. दोन दिवसांतील वास्को पोलिसांनी (Vasco Police) केलेली ही दुसरी कारवाई असून दोन दिवसात एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आली आहे.

Vasco Police
तृणमुलने आंतोनियो क्लोविस यांना डावलले

वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी वास्को पोलिस गस्तीवर असताना बायणा येथे 5 वाजता एक युवक गांजा विक्रीस येणार असल्याचा सुगावा वास्को पोलिसांना लागला असता पोलिसांनी सापळा रचून पाळत ठेवली. याचवेळी एका युवकावर संशय आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा सापडला. त्याने 760 ग्राम वजनाचा गांजा लपवलेला होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 76 हजार एवढी होत आहे. सदर आरोपी सोहेल खान (वय 19) हा खारीवाडा वास्को येथे राहत असून वास्को पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास वास्को पोलिस करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com