दाबोळी येथे विनामास्क फिरणार्‍यांविरोधात वास्को पोलिसांकडून कारवाई

दाबोळी येथील शहर भागात विनामास्क, नाक व हनुवटीखाली मास्क लावून फिरणार्‍यांविरोधात वास्को पोलीस कारवाई करत असल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दाबोळी येथे विनामास्क फिरणार्‍यांविरोधात वास्को पोलिसांकडून कारवाई
Dainik Gomantakवास्को शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना वास्को पोलीस.

vasco: दाबोळी येथील शहर भागात विनामास्क, नाक व हनुवटीखाली मास्क लावून फिरणार्‍यांविरोधात वास्को पोलीस कारवाई करत असल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र मांगोरहिल, बायणा व इतर भागांत बरेचजण मास्क न लावता बिनधास्तपणे फिरत असतात. त्यांच्याविरोधात कारवाई का होत नाही, असा परखड प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dainik Gomantak
फालेरोनंतर यतीश नाईक, विजय पै, सचिव मारिओ पिंटोंनी काँग्रेसला ठोकला राम-राम

मास्क न वापरणार्‍यांविरोधात वास्को पोलीस, मुरगाव पालिका, मामलेदार कार्यालय यांच्यातर्फे कारवाई करण्यात येत आहे. या सर्वांत पोलीस बरेच सक्रिय आहेत. मास्क न घालणार्‍या व मास्क योग्यरीत्या न घातल्याबद्दल पोलीस संबंधितांविरोधात कारवाई करून दंड वसूल करतात. काही वेळा दुचाकीवरून जाणार्‍यांनाही अडवून योग्यरीत्या मास्क न घातल्याबद्दल दंड दिला जात आहे. काहीवेळा पोलीस एखाद्या कार्यालय, दुकान वगैरे ठिकाणी जाऊन मास्क न घालणार्‍यांविरोधात कारवाई करतात.पोलिसांच्या या कारवाईचे बरेचजण समर्थन करत आहेत. मात्र शहर भागातच मास्क न घातल्यास करोना होतो व इतर भागांमध्ये मास्कशिवाय फिरल्यास करोना होत नाही का, असे प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत.

Dainik Gomantak
MGPचे माजी आमदार लवू मामलेदार करणार TMC मध्ये प्रवेश

शहर भागात अतिसक्रिय असलेले पोलीस मांगोरहिल, बायणा व इतर भागांमध्ये का सक्रिय नाहीत, असा प्रश्न वास्कोवासीयांकडून विचारला जात आहे. या भागांतील बरेचजण मास्कला विसरले आहेत. त्यामुळे ते विनामास्क फिरताना नजरेस पडत आहेत. बरेच दुकानदार, ग्राहक मास्कचा वापर करत नसल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी मास्क न घातलेले पण मोबाईल पाहत उभे राहिलेले युवक नजरेस पडतात. गुटखा खाणाऱ्यांना मास्कचा अडथळा होत असल्याने ते मास्कच घालत नसल्याचे दिसून येत आहे.

Dainik Gomantak
Goa: गोमेकॉ बाहेर फळविक्रेते व पोलिसांमध्ये तणाव

वरुणापुरी मांगोरहिल येथे सकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्याकडेला उभे राहणाऱ्या मजुरांपैकी कितीजण मास्क योग्यरीत्या घालतात हा संशोधनाचा विषय आहे. गुटखा खाण्यात गुंग असणाऱ्यांना मास्कचे भानच नसते. पोलिसांनी याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. गुटखा खाऊन रस्त्यावर पचापच थुंकल्याबद्दल व मास्क न घातल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई किंवा निदान त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com