वास्को शहरात अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांची कानउघडणी

वास्को शहरातील भाजी मार्केट, मासळी मार्केट परिसर, फळभाजी, मासळी विक्रेत्यांनी अतिक्रमण करून व्यापलेला असून मिळेल त्या ठिकाणी बसून भर रस्त्यात ते आपला व्यवसाय थाटून बसलेले दिसतात.
वास्को शहरात अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांची कानउघडणी

वास्को: शहरात फळविक्रेते, भाजीविक्रेत्या तसेच लमानी मासळी विक्रेता महिलांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक व रहदारीचा होणारा बोजवारा लक्षात घेऊन, वास्को वाहतूक पोलीस (Vasco Police) निरीक्षक सुदेश नार्वेकर यांच्या विनंतीनुसार, मुरगाव पालिका मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर याने मार्केट परिसरात वाहतूक पोलिसांसमवेत फेरफटका मारून, अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांची कानउघडणी केली. लवकरच या विक्रेत्यांना जागा व्यापून दिली जाणार असून रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्यांचा महाल जप्त करण्याची तंबी देण्यात आली.

वास्को शहरात अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांची कानउघडणी
गोव्यातील मिलिंद म्हाडगुत एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

वास्को शहरातील भाजी मार्केट, मासळी मार्केट (Fish Market) परिसर, फळभाजी, मासळी विक्रेत्यांनी अतिक्रमण करून व्यापलेला असून मिळेल त्या ठिकाणी बसून भर रस्त्यात ते आपला व्यवसाय थाटून बसलेले दिसतात. यामुळे वाहतूक रहदारीला तसेच पादचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील भाजी मार्केट परिसरात साळगावकर हाऊस ते टी बी कुन्हा चौक पर्यंत रस्त्यावर हे व्यावसायिक अतिक्रमण करून बसतात.तसेच एफएलगोम्स राष्ट्रीय महामार्गावर फळविक्रेते अतिक्रमण करून वाहतूक रहदारीला आडकाठी आणतात. त्यातच लमाणी मासळी विक्रेते या भर रस्त्यात मधोमध मासळी विक्री करताना दिसतात. या वेळी तिथून येणार्‍या जाणार्‍या वाहनचालकांना, वाहन हाकताना त्रास सहन करावा लागतो. तसेच काही वेळा या ठिकाणी या विक्रेत्यामुळे जाम होत असतो. मग याचा त्रास वाहनचालकांना बरोबर पादचाऱ्यांना सहन करावा लागतो. या अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. तीच परिस्थितीत येथील मासळी मार्केट जवळ उद्भवते.

वास्को शहरात अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांची कानउघडणी
'फक्त लसीकरणासाठीच मुलांना शाळेत बोलावता येणार'

दरम्यान या परिसरात कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्याच्या तक्रारी वारंवार येथील वाहतूक पोलिसांकडे केली जाते. या तक्रारींना अनुसरून, वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी पालिका मुख्याधिकारी नगराध्यक्ष दामोदर कासकर तसेच पालिका अभियंते यांच्यासमवेत सदर परिसराची पाहणी केली असता, त्यांना अतिक्रमणाचा बोजवारा रस्त्यावर दिसला. त्यांनी सर्व व्यावसायिकांना सूचना देऊन अतिक्रमण हटविण्यास सांगितले. तसेच मासळी विक्रेत्यांनाही तेथून हुसकावून लावले. परत अतिक्रमण केल्यास सर्व माल जप्त करण्याचा आदेश पालिका कर्मचाऱ्यांना दिला असूनअसून, सदर कारवाईला आज पासून सुरू होणार आहे. तसेच या व्यावसायिकांना रस्त्याकडेला जागा व्यापून दिली जाईल. जेणेकरून विक्रेत्यांचा त्रास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना होणार नाही. या आदेशाचे पालन सदर व्यवसायिक कितपत करतात यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com