Vasco: प्राणी अत्याचार, दोषींवर कारवाई करण्याची वास्को वासियांची मागणी

Stray cattle
Stray cattle Dainik Gomantak

वास्कोत प्राण्यांवर, विशेषत: भटक्या गाईंवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. तसेच, भटक्या गाईंसाठी शेड उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (Vasco resident demands action against animal cruelty)

Stray cattle
गोव्यात सहा महिन्यांत पिंक फोर्सला 1462 कॉल्स

मुरगाव पोलिस, मुरगाव नगर परिषदेला भटक्या गाईंसाठी शेठ उभारावे अशी मागणी करणारे पत्र लिहणार आहेत. अशी माहिती मुरगावचे पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. नगर परिषदेला भटक्या गाईं पकडण्यासाठी आवश्यक्ता भासल्यास पोलिसांची मदत देखील पुरवली जाईल. तसेच, प्राण्यांवर अत्याचार करण्यांवर योग्य कारवाई केली जाईल. असे कुमार म्हणाले.

दरम्यान, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी विधानसभेत भटके प्राणी आणि त्यांच्यावरील अत्याचार हा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात योग्य कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com