‘जनमन उत्सवा’ला वास्कोत प्रतिसाद!

वास्कोत ‘जनमन उत्सवाला’ महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
‘जनमन उत्सवा’ला वास्कोत प्रतिसाद!
Janman UtsavaDainik Gomanatk

मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी या तीन मतदारसंघांत ‘जनमन उत्सव’ (Janman Utsava) सर्वेक्षणाअंतर्गत महिलांची मते जाणून घेतल्यानंतर वास्को मतदारसंघात सुरू झालेल्या या सर्वेक्षणाला सतत दुसऱ्या दिवशीही महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Janman Utsava
नोकऱ्या देण्यासाठी बाबूंना आणखी पाच वर्षे कशाला?

आज अंजुमन शाळा परिसरात हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सर्व सामाजिक स्तरांतील महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी मते नोंदवून आपल्याला भविष्यात गोवा कसा हवा आहे याची नोंद केली. काल सासमोळे या भागात हे सर्वेक्षण झाले होते.

या सर्वेक्षणाद्वारे ‘गोमन्‍तक’ (Gomantak) गोव्यातील 3 लाख महिलांपर्यंत जाणार असून, त्यांच्या अपेक्षा आणि आकांशा जाणून घेणार आहे. त्यानंतर या संदर्भात एक विस्तृत कृती आराखडा तयार करून महिलांना त्यांचे स्वतःचे असे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्‍यान, कुंकळ्ळी (Cuncolim) मतदारसंघात आज भेकलेवाडा आणि कुलवाडा येथे हे सर्वेक्षण करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी मिळालेला प्रतिसाद उत्तम होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com