रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाचा अखेर श्रीगणेशा..!

मांगोरहिल ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलावरील दोन फाट्यांपैकी एका फाट्याचे काम पूर्ण होणार; नगरविकास मंत्री मिलिंद नाईक
Vasco वरुणापुरी मांगोरहिल ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलाचे चाललेले काम.
Vasco वरुणापुरी मांगोरहिल ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलाचे चाललेले काम.Dainik Goamnatak

दाबोळी: वास्को (vasco) वरुणापुरी मांगोरहिल ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलावरील दोन फाट्यांपैकी एका फाट्याचे काम येत्या 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुरगावचे आमदार व नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले. काटे बायणा ते मुरगाव बंदर, अंटार्क्टिका संशोधन केंद्र या उड्डाण पुलांवर दिवा बत्तीची सोय केल्यावर बायणा किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाच्या दुसऱ्या टण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Vasco वरुणापुरी मांगोरहिल ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलाचे चाललेले काम.
Goa: 'गोमंतकीय कोंकणी-मराठी चित्रपटांसाठी गोवा प्रिमीयर विभाग इफ्फीचा अधिकृत करा'
Vasco Resumption of work on stalled flyover
Vasco Resumption of work on stalled flyover Dainik Goamnatak

झुआरीनगर वेर्णा तिठा ते वरुणपुरी राष्ट्रीय चौपदरी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र वरुणापुरी ते मुरगाव बंदर हा सुमारे 5.3 किलोमीटरचा महामार्ग गेल्या काहीवर्षांपासून रखडला आहे. या महामार्गात येणारे अडथळे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी दूर केले होते. सड़ा भागातील घरे वाचविण्यासाठी त्यांनी मुरगाव बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची कल्पना पुढे केली होती. त्यानुसार ऑक्टोबर 2015 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या उडाण पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

हे काम अठरा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार होते. तथापि काही तांत्रिक, आर्थिक कारणास्तव या उड्डाण पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून कामाला चालना दिली आहे. त्यामुळे बायणा येथून मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक एक व धक्का क्रमांक नऊला जोडणाऱ्या रस्त्याचे उर्वरित काम सुरू झाले आहे. बायणा येथून या उड्डाण पुलाला दोन फाटे फुटले आहेत. एक मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक नऊला थेट जोडण्यात येणार आहे, तर दुसरा फाटा बोगदा येथीलअंटार्क्टिका संशोधन केंद्रासमोरच्या रस्त्याला जोडण्यात आला आहे. तेथून रस्ता सडा भागातून मुरगाव बंदराकडे जातो. या दोन फाट्यांपैकी एक फाटा १९ डिसेंबला खुला करण्यात येणार असल्याचे संकेत मंत्री नाईक यांनी दिले.

Vasco वरुणापुरी मांगोरहिल ते मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलाचे चाललेले काम.
पारंपारिक पद्धतीने महेश मांद्रेकर तयार करतात खाजे मिठाई!

गॅमन कंपनीने आपल्या कामाला वेग दिला आहे. बायणा किनाऱ्याजवळून हा उड्डाण पूल जात असल्याने या पुलावरून प्रवास करताना मरिन ड्राईव्हची आठवण संबंधितांना येईल, असे स्व. मनोहर पर्रीकर यांनी म्हटले होते. त्यांचे स्वप्न 19 डिसेंबरला प्रत्यक्षात येणार आहे. उड्डाण पुलाचा एक फाटा खुला झाल्यावर बायण किनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. स्वच्छ व सुंदर अशा बायणा किनाऱ्याकडे लोक आता आकर्षित होत असल्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com