वास्को-सडा येथील वटपौर्णिमा उत्सव रद्द

 At Vasco-Sada Vatpoornima celebration canceled
At Vasco-Sada Vatpoornima celebration canceled

मुरगाव, 

हेडलॅन्ड सडा येथील श्री इस्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायण देवालयातर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणारा वटपौर्णिमा उत्सव यंदा कोरोनामुळे साजरा न करण्याचा निर्णय देवालय समितीने घेतल्याचे अध्यक्ष प्रेमानंद केरकर यांनी कळविले आहे.
कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. त्यातच सडापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगोरहिल परिसरात कोरोनाचा सामुहिक संसर्ग पसरला आहे. याची दखल घेऊन सड्यावरील श्री इस्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायण देवालयाने शुक्रवारी ता. ५जून रोजी साजरा करण्यात येणारा पारंपरिक वटपौर्णिमा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com