वास्कोला 75 मीटरची जेटी मिळवून देणार - मंत्री निळकंठ हळर्णकर

खारीवाडा येथील मासेमारी जेटी अनेक वर्षापासून दुर्लक्षित
Nilkanth Halankar
Nilkanth HalankarDainik Gomantak

वास्को: वास्को खारीवाडा येथील जीर्ण झालेल्या मासेमारी जेटीच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अखिल गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री फिलीप डिसोझा, नगराध्यक्ष लिओ रॉड्रीग्स, नगरसेवक विनोद किनळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. (Vasco to get 75 meter jetty - Minister Nilkanth Halankar )

Nilkanth Halankar
वाडी,शिवोली येथील घरफोडी प्रकरणी 5 जणांना अटक

खारीवाडा येथील मासेमारी जेटी गेल्या अनेक वर्षापासून जीर्णावस्तेत पडून होती. त्यामुळे येथील मासेमारी व्यवसायीकांना त्यांच्या मासेमारी ट्रॉलरपासून नुकसान सोसावे लागत आहे. तसेच जेटी लहान व ट्रॉलर्सची संख्या दोनशेहून वर असल्याने ही जेटी अपूरी पडत आहे. यापूर्वी एमपीए (एमपीटी) ने देखील मासेमारी जेरीच्या दुरुस्तीची कामे तात्पुरत्या स्वरूपात घेतली होती. मात्र त्याचा फायदा मच्छिमारी व्यवसायिकांना झाला नाही.

तसेच अखिल गोवा बोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष फिलीप डिसोझा यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन याविषयी सरकारचे लक्ष वेधून घेतले होते व या जेटी सरकारने नव्याने बांधून देण्याची मागणी केली होती. याविषयी चालू असलेल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनातही आवाज उठविण्यात आला होता.

Nilkanth Halankar
खलाशांची पेन्‍शन योजना कायमस्‍वरूपी करा - वेन्‍झी व्हिएगस

त्यानुसार मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी आज खारीवाडा येथे येऊन जीर्णावस्थेत असलेल्या जेटीची पाहणी केली. यावेळी अखिल गोवा फिशिंग बोट मालक संघटनेच्या सदस्यांनी मच्छिमारांच्या फायद्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या संपूर्ण फिशिंग डोटीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला अनुसरून वास्कोला 75 मीटरची जेटी मिळवून देणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री हळर्णकर यांनी मच्छीमार व्यावसायिकांना दिले आहे.

यावेळी मंत्री हळर्णकर यांनी बोलताना जेटी विषयी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी माझ्यासमोर सर्व गोष्टी नजरेस आणून दिल्या असून आम्ही त्यानुसार पुढील प्रक्रीया सुरु केली आहे. सर्व सोपस्कर पुर्ण झाल्यानंतर खारीवाडा जेटीची तात्पुरती डागडू‌जी करणार आहे. त्यासाठी 21 लाख रुपये खर्च येणार असल्याचे ते म्हणाले.

तसेच अखिल गोवा फिशिंग बोट ओनर्स संघटनेच्या मागणीनुसार 75 मीटर लांबीची जेटी मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी सध्या ही 50 मीटर लांबीची जीर्ण झालेल्या जेटीचे तात्पुरते काम करून घेणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री हळणकर यांनी सांगितले.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी आपण खारीवाडा जेटी विषयी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला व खारीवाडा येथे मच्छिमारी व्यवसायिकांना होणारा त्रास सरकार दरबारी नजरेस आणून दिला आहे.खारीवाडा जेटी ही एमपीटीहून अगोदरची जेटी असून या जेटी विषयी उद्‌भवणारे प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना येथे पाचारण करुन त्यांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच एमपीटी बरोबर बसून या जेटीचा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल असे ते म्हणाले.

अखिल गोवा बोट ओनर्स असोसियशनचे अध्यक्ष फिलीप डिसोझा यांनी बोलताना सदर जेटी 50 मीटर इतकीच लांब आहे. तर आमच्या 250 बोटी आहेत. सदर जेटी लहान पडत असल्याने काही मच्छिमारी व्यवसायीकांना आपल्या बोटी खोल समुद्रात उभ्या कराव्या लागतात. तसेच सदर जेटी जीर्ण झाल्याने आमच्या बोटी परत परत कामाला येतात.

तेव्हा व्यवसाय फायदेशीर होत नाही. त्यासाठी सदर जेटी आणखी वाढवून 75 मीटर एवढी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी मंत्र्यांकडे केली. खारीवाडा येथे जेटीची पाहणी करून जेटीच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मत्स्यव्यवसाय मंत्री हळणकर यांनी मित्स्यव्यवसायीकांसी वार्तालाप करुन त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com